महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व 28 शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 17 नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

पदव्युत्तर शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
पदव्युत्तर शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन

By

Published : Nov 16, 2020, 8:54 PM IST

अमरावती- कोरोनाच्या संकटातून सावरत असताना जिल्ह्यातील शैक्षणिक वेळापत्रकही पूर्व पदावर येताना दिसून येत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व 28 शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वाजल्यापासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ही मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. यानंतर विद्यापीठ जाहीर करेल त्या तारखेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठात यावे लागणार आहे. यासंदर्भात ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रमुख डॉ. वर्षा नाठार यांनी माहिती दिली.

अशी आहे प्रक्रिया

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षांचे निकाल 20 नोव्हेंबरपर्यंत घोषित होणार आहेत. त्यामुळे 20 नोव्हेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शाखेच्या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज करताना 300 रुपये आणि राखीव प्रवर्गातील विद्यर्थ्यांना 200 रुपयांचा धनादेश जोडावा लागणार आहे. जर काही विद्यार्थ्यांचे निकाल उशिरा लागलेत तर त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही दिवसांची सूट दिली जाणार आहे.

परप्रांतातील विद्यार्थ्यांना संधी नाही

कोरोना अद्याप पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. आशा परिस्थितीत परप्रांतातून अमरावती शहरात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सद्या तरी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे 17 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे परप्रांतातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

तीन तासात 50 विद्यार्थ्यांनाच प्रवेश-

ज्या विद्यार्थ्यांनी इच्छित शाखेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज केलेत त्यापैकी दररोज 50 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाच्या सभागृहात बोलविले जाणार आहे. दररोज तीन तास चालणाऱ्या प्रवेश प्रक्रिये दरम्यान 50 जणांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. प्रवेशाचे राऊंड वाढले तरी चालतील मात्र 50 हुन अधिक विद्यार्थी एका दिवसात येणार नाही, अशी व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details