महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत कोरोनाची 'ब्रेक द चेन'; मात्र व्यापारी, कामगारांचा विरोध - अमरावती कोरोनाची 'ब्रेक द चेन

मागील लॉकडाऊन नंतर आता दोन तीन महिन्यात सर्व सुरळीत होत आहे. आता पुन्हा आमचा व्यवसाय महिनाभरासाठी बंद करणे हा आमच्यावर अन्याय आहे. अशा स्वरूपाचे निवेदन घेऊन विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Apr 6, 2021, 7:51 PM IST

अमरावती -राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना राज्य शासनाने 'ब्रेक द चेन' ची घोषणा केली आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद केले आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात येत आहे. अशात शासनाने घेतलेल्या बंदच्या निर्णयावर व्यापारी, कामगार बेचैन झाले असून, शहरातील सर्व दुकाने सुरू करावीत अशी मागणी केली जात आहे.

अमरावतीत कोरोना स्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या अनेक संघटनामागील लॉकडाऊन नंतर आता दोन तीन महिन्यात सर्व सुरळीत होत आहे. आता पुन्हा आमचा व्यवसाय महिनाभरासाठी बंद करणे हा आमच्यावर अन्याय आहे. अशा स्वरूपाचे निवेदन घेऊन विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बाजारपेठ बंदशहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, राजापेठ, गडगेनागर, चपराशीपुरा या भागातील बाजारपेठा बंद होत्या. भाजी आणि फळ विक्रेते, औषधीचे दुकान, मॉल सुरू असले तरी बंदचा परिणाम काहीसा जाणवत आहे.इतवारा बाजार परिसरात गजबजशहरातील केवळ अत्यावश्यक सेवांची दुकानं उघडी असताना इतवारा बाजार परिसर दिवसभर गजबजला पहायला मिळाला. विशेष म्हणजे या भागात कपड्यांच्या दुकानही सुरू असल्याचे पहायला मिळाले.बस स्थानकावरही गर्दी'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या काही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहे. मात्र, अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. कोरोनामुळे बस सेवा बंद होईल या धास्तीने अनेक जण शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकावर आल्याचे पहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details