महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकरी गमावल्यावर 'त्यांना' स्वयं-रोजगारातून गवसला समृद्धीचा मार्ग; तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांची कहाणी - नोकरी सोडून व्यवसाय कसा करावा

अमरावती शहरातील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांवर अचानक बेरोजगारीचे संकट ओढवले आणि त्यांचा पोटा-पाण्यासाठीचा मार्गच बदलला. शशांक नागरे, मनीष जगताप आणि शेखर जोशी असे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली नावे. आज मात्र तिघांनी कॅमेरा थोडा बाजूला ठेऊन प्रत्येकाने स्वतंत्र असा व्यवसाय थाटला आहे.

अमरावती
अमरावती

By

Published : Nov 4, 2020, 6:56 PM IST

अमरावती- भव्य मोर्चा निघाला की, त्यातील क्षणचित्रे टिपण्यासाठी ते कधी विजेच्या खांबावर चढायचे, कधी एखाद्या झाडाच्या फांदीवर उभे राहायचे तर कधी मोठ्या इमारतीच्या छतावरून छायाचित्र काढायचे.आपल्या कॅमेऱ्यातून छायाचित्र कसे चांगले येईल याची सारी ही धडपड.. कुठे कधी मारामारी सुरू असताना, गंभीर अपघाताचे प्रसंग यासोबतच निसर्गातील विविध रंगछटा टिपून वृत्तपत्राद्वारे अनेकांसमोर सादर करून आपल्या कलेसह नावाचा ठसा उमटवणाऱ्या अमरावती शहरातील तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांवर अचानक बेरोजगरीचे संकट ओढवले आणि त्यांचा पोटा-पाण्यासाठीचा मार्गच बदलला. शशांक नागरे, मनीष जगताप आणि शेखर जोशी असे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली नावे. आज मात्र तिघांनी कॅमेरा थोडा बाजूला ठेऊन प्रत्येकाने स्वतंत्र असा व्यवसाय थाटला आहे. आजपर्यंत इतरांसाठी काम केलं आता मात्र स्वतःच्या व्यवसायात भविष्याची समृद्धी दिसते आहे. हे सगळं उशिरा कळलं असलं तरी आपण आता याच मार्गाने पुढे जायचं, यशस्वी व्हायचं असे तिघेही म्हणतात.

नोकरी गमावल्यावर 'त्यांना' स्वयं-रोजगारातून गवसला समृद्धीचा मार्ग; तीन वृत्तपत्र छायाचित्रकारांची कहाणी
अपघातामुळे शशांक नागरे यांची बदलली वाटदोन मुलीचा बाप म्हणून मेहनतीने मुक्त छायाचित्रकाराचे काम करीत असताना मुलीला फार्मसी शाखेत प्रवेश मिळाला आणि शशांक नागरे यांनी मुलीला अडचण येऊ नये म्हणून बटाईने शेती करायचे ठरविले. पहाटे 4 वाजता अमरावतीपासून 15 कि.मी अंतरावर शेतात कामाला जायचे. 10 वाजता घरी परत आल्यावर त्यांच्याकडे असलेल्या एकूण पाच वृत्तपत्रांसाठी दिवसभर घडणाऱ्या घटनांचे छायाचित्रे काढायची. सायंकाळी पुन्हा शेतात जायचे असा दिनक्रम सुरू असताना 18 डिसेंबरला सकाळी शेतातून घरी येताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. मोठा अपघात झाला. या अपघातानंतर उजव्या पायावर नागपूरला शास्त्रक्रिया करण्यात आली. होते नव्हते ते पैसे गेले. आता दीड दोन महिने झाले ते कसे बसे चालायला लागले. छायाचित्रकार म्हणून पूर्वीसारखी धडपड करता येणार नाही, हे लक्षात येताच छत्री तलाव परिसरात त्यांनी अंकुरित कडधान्याची पौष्टिक भेळ विक्री सुरू केली. पहाटे 5 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत छत्री तलाव परिसरात फिरायला येणाऱ्यांना पौष्टिक भेळ आवडायला लागली तसा शशांक नागरे यांचा स्वतःच्या नव्या व्यवसायप्रती आत्मविषश्वासही वाढायला लागला. मनीष झाला चहावालावृत्तपत्र छायाचित्रकार मनीष जगताप हे नाव अमरावती जिल्ह्यातील कोण्या वृत्तपपत्र वाचकांना माहिती नसेल हे शक्य नाही. 17 वर्षांपूर्वी वृत्तपत्र क्षेत्रात छायाचित्रकार म्हणून आलेल्या मनीष जगताप यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रात नोकरी मिळविली. लहान-सहान वृत्तपत्रातील पत्रकारांपेक्षा छायाचित्रकार असणाऱ्या मनिषचे वेतन अधिक होते. खरे तर यामागे प्रचंड मेहनत होती. शहरातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीशी असणारा परिचय, दांडगा जनसंपर्क असणाऱ्या मनीष जगताप यांनी विविध छायाचित्र स्पर्धेत बाजी मारली. आता चार-पाच वर्षात आपण निवडलेला मार्ग योग्य होता, असे मनीष जगताप यांना वाटत असतानाच कोरोनाचे संकट येताच त्यांना थेट घरचा मार्ग दाखविण्यात आला. आई, पत्नी, दोन लहान मुली आशा आपल्या कुटुंबाचे पोट भरायचे कसे? या विवंचनेत खचलेल्या मनिषने आता मी लोकांना चहाच पाजाणार असा निश्चय केला. खापर्डे बगीचा परिसरात क्रांती चौधरी आणि चेतन चौधरी यांनी एक रुपयाही शुल्क न घेता मनिषला चहा विकायला जागा उपलब्ध करून दिली. आज चहासोबत नाश्ताही मनीष ग्राहकांना देतो आहे. विशेष म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये एका व्यक्तीला आपण कामावर ठेऊन त्यास पगार देतो आहे, याचा आनंदही मनिषला आहेच. हा एक वेगळा प्रवास सुरू झाला असताना आपण स्वयंनिर्भर होतो आहे, याचा आनंद मनीष जगताप यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.शेखरची पाणीपुरी झाली लोकप्रियशशांक नागरे, मनीष जगताप यांच्या प्रमाणेच शेखर जोशी हे नाव वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध. कोरोना काळात आता तुम्ही घरी राहा, असे 'साहेबां'नी शेखरला सांगितल्यावर शेखरला मोठा धक्काच बसला. खरेतर आता लग्नाचे स्वप्न रंगवू लागणाऱ्या शेखरवर आधी पोटा-पाण्याची सोय लावण्याची वेळ आली. वडील नानंदुभाऊ जोशी हे 40 वर्षांपासून पाणीपुरीचा व्यवसाय करीत आहेत. शेखरने निर्णय घेतला आपण पण लोकांना पाणीऊरी खाऊ घालायची. कंवर नगर चौकात घराशेजारीच पाणीपुरीचा व्यवसाय शेखरने सुरू केला. अवघ्या 15 दिवसात शेखरची पाणीपुरी लोकप्रिय झाली, तसा गल्लाही वाढायला लागला. वृत्तपत्रासाठी फोटो काढल्यावर महिन्याला जितके रुपये मिळायचे त्यापेक्षा पाचपट आपल्या व्यवसायात आपण मिळवतो, हे लक्षात येताच आता लग्नाचे स्वप्न शेखर पुन्हा रंगवू लागला.फोटोग्राफी तर करूचपोटा-पाण्यासाठी आम्ही नवा व्यवसाय निवडला असाल तरी वेळप्रसंगी आम्ही आमचा कॅमेरा हातात घेऊन 'फोटोग्राफी' करूच. मात्र, आता आपल्या व्यवसायाला अधिक प्राधान्य द्यायचे आहे, असे तिघेही म्हणतात.

ABOUT THE AUTHOR

...view details