अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti ) निमित्त अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील ( Amravati Student Make Sword ) कला शिक्षकांच्या पुढाकाराने शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीतील कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी दहा बाय पन्नास फुटांची तलवार साकारली आहे. या तलवारीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी शिवसृष्टीही साकारली जात आहे.
अशी साकारली जात आहे शिवसृष्टी -
कचऱ्यातून कला या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातचे मुख्याध्यापक आशिष देशमुख आणि कलाशिक्षक श्रीकांत काळबांडे यांच्या पुढाकाराने पृष्ठ, कागद, कापड, फेविकॉल, गेरू तसेच विविध रंग यांच्या साह्याने ही तलवार साकारण्यात येत आहे. या तलवारीवर जिजामातेच्या स्वरूपात चंद्रकोर काढण्यात आली असून शिवपिंड, किल्ला, ध्वज, शिवरायांचा जिरेटोप, शिवाजी महाराजांची राजमुद्रा व विविध आभूषणांनी या तलवारीवर शिवसृष्टी साकारण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक आशीष देशमुख 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. ही तलवार साकारताना कलेसाठी गणित आणि भूमिती या विषयाचे किती महत्त्व आहे. याची जाणीवही विद्यार्थ्यांना करून दिली जात असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.