अमरावती-पोलिसांनी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याने शहराच्या सर्व प्रमुख आणि गर्दीच्या परिसरात नाकाबंदी केली. पोलिसांकडून दुचाकीस्वारांची चौकशी तसेच कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बुधवारपासून या कारवाईला सुरुवात झाली असून 2 दिवसात संशयित वाटणाऱ्या 45 पेक्षा जास्त दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच आरती सिंह यांनी शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी शहरात आठ महिन्यात 188 दुचाकी चोरीला गेल्या असल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले. दुचाकी चोरीला आळा बसावा यासाठी वाहतूक शाखेला दुचाकी वाहनांची कसून तपासणी करा असे आदेश त्यांनी दिले.