अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे सर्व नागरीक घरात आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही नागरिकांच्या सुरक्षेसाठी भर उन्हाळ्यात रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चांदुर बाजार शहरात पोलिसांच्या रूट मार्चवर नागरिकांनी पुष्प वर्षाव करून पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
अमरावतीच्या चांदुर बाजारमध्ये पोलिसांच्या रूट मार्चवर नागरिकांचा पुष्प वर्षाव
देशात सध्या कोरोनाचे सावट अधिकच वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहून कोरोनाशी दोन हात करावे, असे वारंवार सांगण्यात येत आहे.
देशात सध्या कोरोनाचे सावट अधिकच वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहून कोरोनाशी दोन हात करावे, असे वारंवार सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरू असतानादेखील आपल्या कुटुंबाची कुठलीही पर्वा न करता पोलीस शिपायापासून ते अधिकारी हे सेवा देत आहे. चांदुर बाजारमध्येही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाळत आहे. तसेच लोकांना कोरोनाविषयी जनजागृती व्हावी, नागरिकांनी दक्षता घ्यावी याचे आवाहन करण्यासाठी पोलिसांच्यावतीने चांदुर बाजार शहरात रूटमार्च काढण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी पोलिसांच्या या रूट मार्चवर गुलाबांच्या फुलांचा पुष्प वर्षाव करून पोलिसांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.