अमरावती - महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जन अधिकार मंचकडून गुरुवारी सायंकाळी मानवी शृंखला तयार करून शहरात निघणार्या रॅलीला पोलीस आयुक्तांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. विशेष म्हणजे परवानगी नाकारल्यावर ही रॅली निघाली तर अनुचित प्रकार घडू शकतो या धास्तीने शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्यासाठी मानवी शृंखलेला पोलिसांनी नाकारली परवानगी - महात्मा गांधींना श्रद्धांजली अमरावती
पोलिसांनी या कार्यक्रमची परवानगी रद्द केली जात असल्याची माहिती जन अधिकार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, हा कार्यक्रम नेहरु मैदान येथे घेण्यात यावा, अशा सूचनाही पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आयोजकांना दिली होती. दरम्यान, आयोजकांनी नेहरु मैदान येथे सायंकाळी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करुन कार्यक्रम आटोपता घेतला.
शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त
दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी या कार्यक्रमची परवानगी रद्द केली जात असल्याची माहिती जन अधिकार मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, हा कार्यक्रम नेहरु मैदान येथे घेण्यात यावा अशा सूचनाही पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी आयोजकांना दिली होती. दरम्यान, आयोजकांनी नेहरु मैदान येथे सायंकाळी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी तीस ते चाळीस कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करुन कार्यक्रम आटोपता घेतला.