अमरावती :उद्धव ठाकरे हे आज अमरावतीत आहे. अशातच राणा दाम्पत्याने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात हनुमान चालीसा पठण करण्याची तयारी सुरू केली होती. त्याचे पोस्टर राणा दाम्पत्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व लावले होते. शिवसैनिकांना याची माहिती मिळताच त्यांनी राणा दाम्पत्याद्वारे शहरभर लावलेले पोस्टर्स फाडून फेकले होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या आगमनाचे लागलेले पोस्टर्स आमदार राणा यांच्या कार्यकर्त्यांनी फाडून फेकले होते. एकमेकांचे पोस्टर फाडले होते. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याचे फलक फाडून निषेध केला. शिवसैनिकांनी राणांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाही दिल्या.
हनुमानजीचा फोटो असलेले फ्लेक्स : राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. या पोस्टरमुळे संतप्तशिवसैनिकांनी रोष व्यक्त करीत शहरात लागलेले हे सर्व पोस्टर फाडून फेकले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे याने सुनील राऊत, सचिन ठाकरे व इतर 8 ते 10 पदाधिकारी यांच्यासह त्यांनी भगवान श्री हनुमानजीचा फोटो असलेले फ्लेक्स फाडले. तसेच खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या फोटोला चाकूने फाडून अश्लील शिवीगाळ केली. यावर सखोल चौकशी करून तात्काळ गंभीर गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार गाडगे नगर पोलीस स्टेशनला दिली आहे.
हनुमान चालीसा पठण करण्याचे कारण :यावर्षी पुरेसा पाऊस पडून शेतकरी सुखी समाधानी व समृद्ध व्हावा, यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचे ठरविले आले होते. तसे पोलिसांना निवदेनही देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लावलेले पोस्ट शिवसैनिकांनी फाडल्यानंतर राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी राजकमल चौकात लावलेले पोस्टर फाडले. शिवसैनिक आणि राणा समर्थकांमध्ये सुरू असलेला हा पोस्टर वार पाहता पोलिसांनी शहरातील सर्व मुख्य चौकांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.