महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीच्या पोलीस आयुक्त रस्त्यावर; लॉकडाउनच्या परिस्थितीचा घेतला आढावा

By

Published : Feb 23, 2021, 1:43 PM IST

अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. दरम्यान लोकांनी हे लॉकडाउन पूर्णपणे पाळले पाहिजे, यासाठी अमरावती शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात आहे. दरम्यान, लॉकडाउन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आज रस्त्यावर उतरल्या होत्या.

amravati police commissioner on the road to review of the lockdown situation
अमरावतीच्या पोलीस आयुक्त रस्त्यावर; लॉकडाउनच्या परिस्थितीचा घेतला आढावा

अमरावती -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. दरम्यान लोकांनी हे लॉकडाउन पूर्णपणे पाळले पाहिजे, यासाठी अमरावती शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात आहे. लॉकडाउन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आज रस्त्यावर उतरल्या होत्या. देशात अनलॉक झाल्यानंतर लॉकडाऊन झालेले अमरावती हे देशातील पहिले शहर आहे. या लॉकडाऊनमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप -

यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी लोकांशी सवांद साधून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे अवाहन केले. तसेच ज्या दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी झाली, त्या दुकानदारांना तंबी दिली. सोमवारी रात्री 8 वाजतापासून सुरू झालेल्या या 7 दिवसांच्या लॉकडाउन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. जे व्यावसायिक लॉकडाउनचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान शहरातील विविध ठिकाणी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप सुद्धा आयुक्तांकडून करण्यात आहे.

हेही नाही - माघी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास

ABOUT THE AUTHOR

...view details