अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. अंजनगाव येथे संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे लोक काम नसताना विनाकारण फिरत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडून गुन्हा दाखल केला.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल - people violated curfew
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. अंजनगाव येथे संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचारबंदीच्या काळात शहारासह सगळीकडे पोलीस पेट्रोलींग करत आहेत. पोलीस पेट्रोलिंग करत असताना गुन्हा दाखल केलेले 5 जण विनाकारण फिरताना आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोसिन अब्दुल राजीक (२२), अब्दुल राजिक (२४), नावेद अली जाफर अली (२५), अंनिस खान युनुस खान (२५), साजिद खान मुज्फर खान (२५) सर्व रा. डब्बी पुरा तहसील रोड सुर्जी अंजनगाव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यांच्यावर कलम १८८, २६९ भादवी, कलम ११ बी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कलम ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२०, कलम ३७(३), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये सदर गुन्हा दाखल केला आहे.