अमरावती -खासदार नवनीत राणा या सार्वजनिक जीवनात सातत्याने चर्चेत राहतात. कधी त्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांसोबत होळीला आदिवासी नृत्य करताना दिसतात तर कधी क्रिकेटच्या मैदानातही दिसतात. यावेळी आता आणखी एका नवीन काम करताना खासदार नवनीत राणा दिसून आल्या.
नवनीत राण आता चर्चेत का?
सध्या गणेशोत्सव जवळ येत आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी कुंभार समाजातील बांधव गणपतीच्या मूर्ती बनवण्यात व्यस्त आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका मुर्तीकाराच्या घरी जाऊन गणपतीची मूर्ती मूर्तीकार तयार करत असतांना मूर्तीवर हात फिरवला. तसेच मूर्तीकाराशी संवाद साधत कशाप्रकारे मूर्ती तयार करण्यात येते? किती वेळ लागतो ही माहिती मूर्तीकाराकडून घेतली. सदर मूर्ती ही मूर्तीकाराने पूर्णपणे तयार केली होती. दरम्यान नवनीत राणा यांनी या मूर्तीवर हात फिरवत मूर्तिकारांशी संवाद देखील साधला. यासंबंधीचा व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे.
हेही वाचा -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात....पाहा व्हिडिओ