महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navneet Rana : 'लिव्ह इन रिलेशनशिप'सह समलैंगिक विवाहावर खासदार नवनीत राणांचे मोठे विधान; पाहा व्हिडिओ - Navneet Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी समलैंगिक विवाहावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या आज अमरावती शहरातील श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांनी तरुण पिढीच्या समलैंगिक विवाहबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच 'लिव्ह इन रिलेशनशिप'वर देखील नवनीत राणा यांनी भाष्य केले आहे.

Navneet Rana On Same Sex marriage
खासदार नवनीत राणा

By

Published : Feb 14, 2023, 8:02 PM IST

Updated : Feb 14, 2023, 8:23 PM IST

खासदार नवनीत राणा

अमरावती :आज मुली-मुलींचे लग्न होत आहे. मुलगा मुलासोबत लग्न करतो आहे, असे विचित्र प्रकार समोर येत आहेत. आजच्या तरुण पिढीमध्ये हा प्रकार नेमका कुठून आला असा प्रश्न उपस्थित करीत खासदार नवनीत राणा यांनी आजच्या तरुण पिढीला भान राखण्याचे आवाहन केले आहे. अमरावती शहरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी तरुण पिढीच्या विचित्र जीवनशैलीबाबत प्रश्न उपस्थित केले.



लिव्ह अँड रिलेशनशिप :आज मुली शिक्षण घेण्यासाठी मोठ्या माशहरात जातात. तेथे भाड्याच्या खोलीत राहून मुलांसोबत लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहतात. या प्रकाराबाबत देखील खासदार नवनीत राणा यांनी आक्षेप घेतला आहे. आई वडील मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. आपले आई-वडील आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टाचा विसर नव्या पिढीला कसा काय पडतो आहे? याबाबत देखील खासदार नवनीत राणा यांनी आश्चर्य व्यक्त केले.

सामाजिक भान राखण्याची गरज :आज इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडियावर अतिशय विचित्र माहिती समोर येते आहे. मुलीने मुली सोबत लग्न करणे, मुलाने मुलांसोबत लग्न करणे हा प्रकार नेमका आपल्या संस्कृतीत कुठून आला आहे. आज आपण स्वावलंबी झालो आहोत. याचा अर्थ आपण कसेही वागावे असे होत नाही. आपल्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आपल्याला वाढवले, शिक्षणासाठी खर्च केला. आई-वडिलांनी केलेल्या कर्तव्याचे भान आपण राखायला हवे.

मुले-मुली सुसंस्कृत समाजाचा घटक :आपणही सुसंस्कृत समाजाचा घटक आहोत. याची जाणीव ठेवून नव्या पिढीने योग्य जीवनशैली अंगीकारावी. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. याचे भान राखून किमान समाजासाठी दहा टक्के योगदान दिले, तरी खूप झाले. सामाजिक कार्य करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असे, देखील खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा -Abdul Sattar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस बोलतात 'ती' काळ्या दगडावरची पांढरी रेष - अब्दुल सत्तार

Last Updated : Feb 14, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details