महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत राणा दाम्पत्याची विनामास्क बुलेट वारी; कोरोना नियमांचा विसर

अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले आहे. त्यामुळे वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे लोक मास्क लावत नाही अशा वाहन चालकांवर कारवाई ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा
रवी राणा आणि नवनीत राणा

By

Published : Feb 19, 2021, 4:37 PM IST

Updated : Feb 19, 2021, 5:54 PM IST

अमरावती-एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वारांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आले आहे. राणा दामपत्याने विना मास्क विना हेल्मेट अमरावतीत बुलटेवरून फेरफटका मारल्याचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करत असताना आता पोलीस राणा दाम्पत्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अमरावतीत राणा दाम्पत्याची विनामास्क बुलेट वारी

नियम सर्वसाम्यानांना, लोकप्रतिनिधींच काय?
अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले आहे. त्यामुळे वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे लोक मास्क लावत नाही अशा वाहनचालकांवर कारवाई ही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आतापर्यत तबल २०० पेक्षा जास्त लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवजयंतीनिमित्त नवनीत राणा आणि रवी राणा दोघेही बुलेटवरून कार्यक्रमाला गेले. मात्र, त्या दोघांनीही मास्क आणि हेल्मेटचा वापर केला नव्हता. त्यामुळे लोकप्रतिनिधीच कोरोनाचे नियम पायळी तुडवत नसेल तर मग सर्वसामान्य लोक कसे नियम पाळतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Last Updated : Feb 19, 2021, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details