महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्तेच्या ताकदीचा दुरुपयोग बरा नव्हे, नवनीत राणांची शिवसेनेवर टीका - कंगना रणौत विरुद्ध शिवसेना

राज्य सरकार कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करत आहे. हा सत्तेच्या ताकदीचा दुरुपयोग सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, म्हणून अशी हुकुमशाही चांगली नव्हे, असे ट्विट करून राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

शिवसेनेवर नवनीत राणांची टीका
शिवसेनेवर नवनीत राणांची टीका

By

Published : Sep 9, 2020, 3:58 PM IST

अमरावती -अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या वादात आता पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री आणि आता अमरावतीच्या खासदार असलेल्या नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंगनाच्या अनधिकृत बांधकामावर बुलढोजर चालवला गेला. त्यामुळे शिवसेनेवर अनेकांनी टीका केली असतानाच आता नवनीत राणा यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे.

राज्य सरकार कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करत आहे. हा सत्तेच्या ताकदीचा दुरुपयोग सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, म्हणून अशी हुकुमशाही चांगली नव्हे, असे ट्विट करून राणा यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्याविरूद्ध मैदानात उतरल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेवर नवनीत राणांची टीका

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगनाने एका संदर्भात मुबंईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि कंगना रणौत यांच्यात वाद सुरू झाला. दरम्यान, ९ तारखेला मी मुंबईत येत आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा कंगनाने शिवसेनेला दिला होता. यावर काल (मंगळवार) मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर, आज त्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने बुलढोजर चालवला. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर ट्विट करत टीका केली आहे.

हेही वाचा -कंगना प्रकरणापासून दूर रहा; गृहमंत्री देशमुखांना हिमाचलमधून धमकीचे फोन

ABOUT THE AUTHOR

...view details