अमरावती - लोकसभा मतदार संघात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज अमरावती-बडनेरा मार्गावर स्थित नेमाणी गोडाउन येथील स्ट्राँग रूमला भेट दिली.
अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणांची स्ट्राँग रूमला भेट - नेमाणी गोडाऊन
नवनीत राणा यांनी आज स्ट्रॉंग रूमला भेट दिली. याठिकाणी २ हजार ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत.
अमरावती मतदार संघातील सर्व २ हजार ईव्हीएम मशीन नेमाणी येथील गोडाउनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर मेळघाटातील अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील ईव्हीएम सायंकाळपर्यंत नेमाणी गोडाउन येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचणार होत्या. मात्र, आज दुपारी नवनीत राणा यांनी स्वतः स्ट्राँग रूमला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
स्ट्राँग रूमला भेट दिल्यावर राणा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेणाऱ्या खेड्यापासून शहरातील सर्व कार्यकर्ते आणि महिलांचे आभार मानले. तसेच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा रक्षकांचेही विचारपूस करत आभार व्यक्त केले.