महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या बडनेरात पाच हजार चॉकलेटपासून साकारले चॉकलेट बाप्पा - ganpati festival

जिल्ह्यातील बडनेरा शहरातील बारीपुरा येथे जयहिंद गणेशोत्सव मंडळाने स्वकलेतून ५ हजार चॉकलेट्सचा वापर करत गणपतीची मूर्ती साकारली. सध्या ही मूर्ती परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

चॉकलेट बाप्पा

By

Published : Sep 10, 2019, 6:26 PM IST

Updated : Sep 10, 2019, 8:46 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा शहरातील बारीपुरा येथे जयहिंद गणेशोत्सव मंडळाने स्वकलेतून ५ हजार चॉकलेट्सचा वापर करत गणपतीची मूर्ती साकारली. सध्या ही मूर्ती परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.

पाच हजार चॉकलेटपासून साकारले चॉकलेट बाप्पा


बडनेरा येथील जयहिंद गणेशोत्सव मंडळ गेल्या ३० वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची स्थापना करत आहेत. यावर्षी मंडळाचे हे ३१ वे वर्ष असून यावेळी मंडळाने ९ प्रकारच्या तब्बल ५ हजार चॉकलेट्सचा वापर करून गणपतीची सुरेख मूर्ती साकारली. या मूर्तीची उंची ७ फूट असून तिला तयार करण्यासाठी मंडळाला १ महिन्याचा कालावधी लागला आहे. मूर्तीचा प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या रंगाच्या चॉकलेट सुशोभित केलेला आहे. सध्या ही गणपती बाप्पाची मुर्त परिसरातील लोकांना आकर्षणाचा विषय ठरत असून मुर्तीसह आकर्षक आरास डोळ्यात साठवून घेण्यास गणेश भक्तांची दररोज अलोट गर्दी होत आहे.


याआधी सुद्धा या मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी स्वकलेने कापसाचा गणपती, भांड्यांचा गणपती, मडक्यांचा गणपती, टोपाल्यांचा गणपती, चमकीचा गणपती, डिस्को मण्यांचा गणपती, ५१ किलो लाल सुपारीचा गणपती, सुकामेवा आणि उपवासाचे पदार्थांचा गणपती आणि मागील वर्षी मोतींचा गणपती साकारला होता.या चॉकलेट बाप्पाला साकारण्यासाठी तबल एक महिन्याचा कालावधी लागला. सन २०१६ साली याच माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ६ फुट उंची असलेली '५१ किलो लाल सुपारीची गणेश मूर्ती' आणि 'जल हैं तो कल हैं' या विषयावर आधारीत देखावा साकारला होता. याद्वारे पाणी किती मोलाचे आहे याचे महत्व प्रेक्षकरुपी गणेशभक्तांना समजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.


केवळ एक प्रयत्न म्हणून सुरु झालेला हा प्रवास मंडळाला थेट "लोकमान्य महोत्सव २०१६" च महाराष्ट्र शासनाच अमरावती जिल्हास्तरीय द्वितीय बक्षिस देऊन गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच. विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबई येथे बक्षिस वितरण कार्यक्रमांत मंडळाला रोख रक्कम, पारितोषिक व मानचिन्ह देण्यात आले. दरवर्षी या मंडळाकडून झाडे लावा झाडे जगवा असे विविध उपक्रमदेखील राबविले जात आहे.

Last Updated : Sep 10, 2019, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details