अमरावती : बहुजन समाजातल्या छोट्या-मोठ्या गटांनी एकत्र येत संयुक्त रिपब्लिकन आघाडी हा पक्ष स्थापन केला आहे. दीड वर्षे पूर्वी या आघाडीची स्थापना झाली आहे. अॅडव्होकेट पीएस खडसे हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला 15 जागा द्याव्यात. या अटींवर आम्ही हा पाठिंबा धीरज लिंगाडे यांना जाहीर करीत असल्याचे अॅडव्होकेट पीएस खडसे यांनी पत्रकार परिषदेतून आज येथे सांगितले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा :यासंदर्भात काँग्रेस पदाधिकारी सुनील देशमुख, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे तसेच आदी पदाधिकाऱ्यांशी कालच बैठक झाली असून, त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत हा पाठिंबा जाहीर करीत असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे.
संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अभियान :संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे 'रिपब्लिकन जोडा, बंधुभाव वाढवा' हे अभियान एक वर्षापासून सुरू आहे. पदवीधरांना आपल्या समाजाच्या हक्काची जाणीव असते व त्या हक्कासाठी संघर्ष करणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. त्यासाठी समाजामध्ये हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई असा कोणताही धर्मभेद करता की, या ब्राह्मण, शुद्र असा कोणता वर्णभेद न करता मी भारतीय आहे.
परिवर्तनाची गरज : भारतातील प्रत्येक व्यक्ती हा माझा बंधू आहे. ही राष्ट्रीय बंधुभावना घेऊन ती वाढवण्याचे अभियान संयुक्त रिपब्लिकन आघाडीने सुरू केले आहे. भारतात असणाऱ्या लोकशाहीचा व राज्यघटनेचा समता, स्वातंत्र्य बंधुतेचा विचार रिपब्लिकन आघाडी जनतेमध्ये रुजवण्याकरता नेहमीच कार्य करते. देशात वाढणारी महागाई बेरोजगारी गरीबी हटवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. राजकीय परिवर्तन घडल्याशिवाय लोकशाही कधीही सुदृढ होऊ शकत नाही.