अमरावती :चांदूरबाजार तालुक्यातील बहिरम कारंजा येथील पंचशिल आश्रम शाळेतील ३० विद्यार्थीनींना शुक्रवारी रात्रीच्या भोजनातून विषबाधा students of tribal ashram school poisoned झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत २९ विद्यार्थीना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खिचडीतून झाली विषबाधा :चांदूरबाजार तालुक्यातील पंचशील आदिवासी आश्रमशाळा आहे. त्यात पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींची संख्या ६०० च्या आसपास आहे. आहाराच्या दैनंदिनीनुसार शुक्रवारी रात्री खिचडीचा आहार देण्यात आला. आहार घेतल्यानंतर विद्यार्थीनी पाणी प्यायल्या. त्यानंतर थोड्या वेळात काही विद्यार्थ्यांना मळमळ जाणवून उलट्या झाल्या. ही बाब शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात येताच मुख्याध्यापकासह शिक्षकांनी या बाधीत ३० विद्यार्थीनींना अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.