अमरावती -दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकज या धार्मिक सोहळ्यात अमरावती शहरातील पाच जण सहभागी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या पाचही जणांना विलगिकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
दिल्ली येथील धार्मिक सोहळ्यात अमरावतीच्या पाच जणांचा सहभाग - मरकाज धार्मिक सोहळा निजामुद्दीन
13 ते 15 मार्च दरम्यान दिल्ली येथील निजामुद्दीन येथे मरकज हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यापैकी काहींना कोरोनाची लागण झाली.
![दिल्ली येथील धार्मिक सोहळ्यात अमरावतीच्या पाच जणांचा सहभाग AMRAVATI CORONA UPDATE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6611392-345-6611392-1585661857642.jpg)
13 ते 15 मार्च दरम्यान दिल्ली येथील निजामुद्दीन येथे मरकज हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यापैकी काहींना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी काहींचा मृत्यूही झाला आहे. या कार्यक्रमाला देश आणि परदेशातील शेकडो लोक सहभागी झाले होते. यामध्ये अमरावती शहरातील पाच जण सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने या पाचही जणांशी संपर्क साधला असून, या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.