महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत उभे राहणार महाराष्ट्रातील शेतकरी; अंबानींच्या कार्यालयावर उद्या मोर्चा - अमरावती शेतकरी अंबानी कार्यालय मोर्चा

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या 26 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 33 शेतकऱ्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी उद्या (२२ डिसेंबर) अंबानींच्या कार्यावर मोर्चा नेणार आहेत.

Application
निवेदन

By

Published : Dec 21, 2020, 8:33 AM IST

अमरावती -गेल्या26 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरू असणाऱ्या पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आता महाराष्ट्रातील शेतकरी उभे राहणार आहेत. यासंदर्भात श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध शेतकरी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत केंद्र शासनाने लादलेल्या कृषी कायद्याचा लाभ केवळ अंबानींना होणार असल्याने 22 डिसेंबरला मुंबईत अंबानींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात पेटणार शेतकरी आंदोलन -

दिल्लीच्या सीमेवर पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र शासनाने लादलेल्या शेतकरी कायद्यांचा परिणाम हा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर होणार आहे. आज शेतकऱ्यांवर संकट कोसळत असून उद्या सर्वसामान्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे. या काळ्या कायद्याविरोधात महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलन पेटणार असून याबाबत प्रत्येक गावात जाऊन जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मुंबईत धडकणार शेतकरी -

शेतकऱ्यांवर अन्याय करून केवळ अंबानींचे हित जोपासण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अंबानींनाच जाब विचारण्यासाठी थेट अंबानीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details