अमरावती -संत्री नागपूरची ( Orange City Nagpur ) प्रसिद्ध असली तरी संत्री उत्पादनात अमरावती ( Amravati Top In Orange Production ) जिल्हा आघाडीवर आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, तिवसा या तालुक्यात सध्या शेतकरी ( Amravati Farmer Cut Orange Farm ) आपल्या शेतातील संत्र्याची झाडे तोडत आहेत. नुकसान प्रचंड होत असल्यामुळे झाडांवर कुऱ्हाड ( Farmer Cut Orange Farm Due To Loss ) चालविणे हाच एकमेव पर्याय असल्याबाबत शेतकरी रोज चिंता व्यक्त करत आहेत. मात्र संत्र्याचे उत्पन्न घेण्यास योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मत कृषी तज्ज्ञ ( Expert Said Not Management In Orange Plantation ) व्यक्त करीत आहेत.
अमरावतीत नुकसानीमुळे संत्र्यांच्या झाडांवर शेतकऱ्यांनी चालवली कुऱ्हाड भाव पडले उत्पादन खर्चही निघणे कठीणसध्या संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी ( Amravati Farmer Cut Orange Farm ) धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात 14 ते 15 वर्षापर्यंत शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आणि जगवलेली संत्र्याची बाग स्वतः कुऱ्हाडीने ( Farmer Cut Orange Farm Due To Loss ) तोडत आहेत. राज्यात द्राक्षाला प्रचंड किंमत आहे, मात्र संत्र्याला काही किंमतच नसल्यामुळे संत्र्याचे उत्पादन आम्ही का म्हणून घ्यायचे असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाल्याची व्यथा अचलपूर तालुक्यातील शेतकरी सचिन चौधरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितली. एका वर्षात संत्रा झाडाचा उत्पादन खर्च हा 550 ते 700 रुपयांपर्यंत येतो. वर्षातून सात आठ फवारण्या आणि दोनदा रासायनिक खतांची भर देऊनही येणारे उत्पन्न अतिशय नगण्य आहे. सध्या आंब्या बहराची संत्री केवळ 20 ते 22 हजार रुपये प्रति टनाचे भाव असल्याने उत्पादन खर्चही तेवढाच असल्याने संत्र्याचे उत्पादन घेणे परवडणारे नाहीत अशी परिस्थिती आहे. ज्या भागात संत्र्यांचे उत्पादन होते, त्या भागात संत्री खरेदी करणारे व्यापारीच नाहीत, अशी देखील गंभीर परिस्थिती आहे.
संत्र्याच्या झाडावरील रोगांवर उपाय नाहीसंत्र्याच्या झाडावर येणाऱ्या रोगांवर कुठलाही उपाय सापडत नसल्यामुळे देखील शेतकरी त्रस्त आहेत. यामुळेच संत्रा उत्पादकांवर ( Amravati Farmer Cut Orange Farm Due To Loss ) आपल्या बागेतील झाडे तोडण्याची परिस्थिती आली आहे. आज एकरभर असणाऱ्या संत्रा बागेला एक लाख रुपये खर्च येत असून त्यातून केवळ दहा ते वीस हजार रुपये मिळत असल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याप्रमाणे खतांचे भाव वाढले, त्या तुलनेत संत्र्याचे भाव वाढलेच नाही. या कारणामुळे आमच्या अचलपूर आणि लगतच्या चांदूरबाजार तालुक्यात अनेक शेतकरी चक्क जेसीबी लावून आपल्या शेतातील संत्र्याची झाडे ( Farmer Cut Orange Farm Due To Loss ) तोडत आहेत. कवठा, बेलज, जसापूर, करजगाव या भागातील शेतकरी आपल्या शेतातील संत्री तोडत आहेत. जसापूर येथील एका शेतकऱ्याने तर चक्क संत्रा झाडी तोडून त्याची तेरवी देखील केल्याचे सचिन चौधरी म्हणाले.
कृषी तज्ञांचे असे आहे मतजगभर जी नागपुरी संत्र्यांची ( Orange City Nagpur ) अविट चव आणि त्याच्या गोडीमुळे जी ओळख होती, ती काही वर्षांपासून राहिली नाही. संत्रा लागवडीच्या बाबतीत म्हणा किंवा संत्रा व्यवस्थापनाच्या बाबतीत उदासीनता आल्यासारखे दिसते आहे. त्याचाच परिणाम आता सिड्रसगिनिंग या रोगासारखे रोग बळवले आहेत. त्यामुळे बागा आर्थिकदृष्ट्या सक्षम न राहिल्यामुळे संत्रा उत्पादक आता संत्रा बागा जेसीबीने काढण्याच्या मागे दिसतात, असे संत्री उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ ( Expert Said Not Management In Orange Farm ) प्राध्यापक आर. के. पाटील ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले.
अशी आहेत कारणेसंत्रा उत्पादक सध्या आपल्या बागेतील संत्र्यांची झाडे ( Amravati Farmer Cut Orange Farm Due To Loss ) तोडत आहेत. याच्या मागे अयोग्य ठिकाणावरून खरेदी केलेल्या कलमा आणि अयोग्य ठिकाणीच लावल्या गेल्या. त्याचे दुष्परिणाम असे झाले, की जे स्वप्न आपण 40 वर्षांच्या बागांचे पहात होतो, त्या बागा उत्पादनक्षम झाल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रोग बळावले. त्यामुळे जमीन त्यात गुंतून पडली. त्याचदरम्यान इतर पिकांना चांगला बाजार भाव मिळायला लागला. कापसाला 8-10 हजार रुपये क्विंटलचे भाव मिळायला लागले. हरभऱ्याला देखील चार पाच हजाराचा भाव भेटायला लागला. तर या हंगामी पिकांना संत्र्याच्या तुलनेत अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाटले की संत्रा झाडाखाली जमीन गुंतलेली आहे. सातत्याने गेल्या चार पाच वर्षापासून त्याचा उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर संत्र्याला दरवर्षी चल येते. तो काढण्याचा मजुरी खर्च आणि सलीमुळे होणारे प्रादुर्भाव खास करून रोगांचा, किडींचा आणि ज्या काही फुलधारणा होतात, त्यांचे फळांमध्ये रूपांतरण होत नसल्याने शेतकऱ्यांना हे असह्य होते. संत्रा बागेचे नियोजन आता खूप महाग झाले आहे. त्याच्यामुळे दरवर्षी सल काढल्या जात नाही. पुन्हा झाड सलाटते आणि त्याच्यावर शेंडे, मर यासारखे रोग येतात. जमिनीमधून वाढणारा फ्लायटोपथोरा यामुळे झाडांचा ऱ्हास होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आता संत्रा बागेतून मन निघाल्यामुळे ते आपले शेत मोकळे करायला लागल्याचेही प्राध्यापक आर. के. पाटील यांनी सांगितले.
अशी घ्यायला हवी होती काळजीआपल्या शेतात संत्र्याच्या बागा ( Amravati Orange Farm ) लावण्यापूर्वी शेतात असणाऱ्या मातीचे परीक्षण शेतकऱ्यांनी करून घ्यायला हवे होते. तसेच संत्र्याच्या खात्रीदायक कलमा ह्या शासकीय रोपवाटिकेतून किंवा खात्रीच्या कलमा घेतल्या असत्या आणि योग्य पद्धतीने त्याचे व्यवस्थापन केले असते तर आज अशी परिस्थिती नसती. अनेक ठिकाणी शेत जमीन संत्र्यांसाठी योग्य नव्हती. मात्र इतरांचे अनुकरण करून अनेकांनी आपल्या जमिनीत संत्र्यांच्या बागा लावल्या. याचा परिणाम म्हणजे या भागांचा व्यवस्थापन खर्च प्रचंड वाढल्याचेही देखील प्राध्यापक आर. के. पाटील म्हणाले.
संत्रा लागवड जमीन क्षेत्रात झाली घट2017 ते 2022 मध्ये जिल्ह्यात केवळ सात हजार हेक्टर जमिनीवर संत्रा लागवड करण्यात आली. जिल्ह्यात संत्र्याखालील क्षेत्र हे 71 हेक्टर असून. पाच वर्षात संत्रा लागवडीखालील जमीन क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आता शेतकरी जागृत होताना दिसत आहेत. शेतकरी आपल्या मातीचे परीक्षण करायला लागले आहेत. माती आणि पाण्याच्या दर्जानुसार संत्रा व्यवस्थापनाचा विचार शेतकरी करायला लागले आहेत. आपल्या शेतजमिनीत चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांच्या वर असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संत्रा घेण्याचा विचार अजिबात करू नये, असे प्राध्यापक आर. के. पाटील म्हणाले.