अमरावती - गेल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झाला आहे. कापूस, तूर, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांची पेरणी केली जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्यात पेरणीसाठी लगबग; कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी - अमरावती खरीप पेरणी तयारी
समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.अमरावती जिल्ह्यातील यावर्षी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर २ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होणे अपेक्षित आहे.
अमरावती जिल्ह्यातील यावर्षी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर २ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आता शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन बियाणांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. तरीसुद्धा उसनवार पैसे घेऊन शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत. या वर्षी लॉकडाऊनमुळे हजारो शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे खरिपाच्या पेरणीसाठी पुरेसे भांडवल नाही. पणन महासंघाने लवकरात लवकर कापसाची खरेदी करून पैसे द्यावे, जेणे करून खरीपाची पेरणी व्यवस्थित होईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे राज्यात बहुतांशी ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात सह विदर्भाच्या काही भागात 18 तारखेपर्यंत 75 ते 100 टक्केपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.