महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायब तहसीलदार ५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

धामणगाव रेल्वे तहसीलमधील नायब तहसीलदाराला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या किसन सूर्यवंशी याने ट्रॅक्टर मालकाकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

नायब तहसीलदार ५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

By

Published : Aug 22, 2019, 7:18 PM IST

अमरावती - धामणगाव रेल्वे तहसीलमधील नायब तहसीलदाराला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या किसन सूर्यवंशी याने ट्रॅक्टर मालकाकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

सूर्यवंशी याने गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. यातील पहिला टप्पा म्हणून पाच हजार रुपये देण्याचे ठरले होते. हेच पाच हजार रुपये स्वीकारताना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सूर्यवंशी याच्यावर कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details