अमरावतीAmravati Crime- वरुड येथील रहिवासी असणारा आशिष ठाकरे याने वनली येथील श्रीमती लताबाई भोंडे यांच्या मुलीशी सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला होता. आशिष ठाकरे हा पत्नीला रोज दारू पिऊन मारत असल्यामुळे ती तीन महिन्यापूर्वी माहेरी निघून आली होती. आशिष हा सासरी जाऊन पत्नीला त्रास देत असल्यामुळे सासू लता भोंडे यांनी मुलीला तिच्या मावशीच्या घरी राजुरा बाजार येथे राहण्यास पाठविले होते.
रविवारी आशिष ठाकरे याने आपल्या मित्राला वंडली येथे सोडून देण्यास सांगितले. मंडलीला येताना त्याने रस्त्यात गाडीत पेट्रोल भरले. एका काचेच्या बॉटलमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोलदेखील भरून घेतले. आशिषला त्याच्या मित्राने वल्ली येथे सोडल्यावर आशिष थेट लताबाई भोंडे यांच्या घरी गेला. त्याने सासू लताबाई भोंडे यांच्यासह मेहुणा प्रणयसोबत वाद घातला. यापूर्वी आशिषने या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. सोमवारी पहाटे आशिषने सासू आणि मेहुण्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना पेटवून दिले. यानंतर त्याने मावस सासरे दिनेश निकम यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लताबाई आणि प्रणय यांना मारून टाकल्याचे सांगितले. तसेच स्वतःही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यानंतर आशिषने आत्महत्या केली.
90 वर्षांची आजी सुखरूप-आशिष ठाकरे याने सासू आणि मेहुण्याला जाळून ठार मारल्यावर घराच्या आतल्या खोलीत लताबाई भोंडे यांच्या 90 वर्षाच्या सासू चंद्रकला झोपल्या होत्या. त्या घरात असल्याची आशिषला माहिती नव्हती. दरम्यान पहाटे बोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे आढळून येतात ग्रामस्थांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा उघडून आग विझवण्यात आली. यावेळी घरात तीन तीन व्यक्तींचे मृतदेह पूर्णतः झालेल्या अवस्थेत आढळून आले.