अमरावती: Amravati Crime News: काकाने दोन वर्षीय चिमुकल्या पुतण्याची पायाखाली तुडवून हत्या ( Uncle Killed his Nephew) केल्याची धक्कादायक घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील पोहराबंदी (Amravati News) येथे घडली आहे.
तो राहायचा वहिनी आणि पुतण्यासोबत :या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime News )महिलेचा आरोपीच्या भावासोबत सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना तीन अपत्ये आहेत. त्याच्यात नेहमी वाद होत असल्याने काही महिन्यांपूर्वी महिला ही चिमुकल्या घेऊन माहेरी शिरपूरला निघून गेली होती.
चिमुकल्याला केली मारहाण : आरोपी हा महिलेच्या माहेरी गेला. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला चांगले ठेवेन, असे म्हणून तो तिला पोहराबंदी येथे घेऊन आला. पोहरा बंदी गावात आल्यावर आरोपी हा वहिनी आणि दोन वर्षाच्या पुतण्यासोबत स्वतंत्र राहू राहायचा. काही दिवसातच आरोपी हा चिमुकल्यावरून महिलेसोबत वाद घालायला लागला. एप्रिलमध्ये आरोपीने माहिले सोबत वाद घालून तिच्यासह चिमुकल्याला मारहाण केली होती. त्यावेळी फ्रेजरपुरा ठाण्यात मारहाणीचा गुन्हा (Fraserpura Police Station) देखील दाखल झाला होता. त्यानंतर महिला ही चिमुकल्यासह पुन्हा माहेरी शिरपूरला निघून गेली. दरम्यान, ऑगस्टमध्ये मुलाची प्रकृती बिघडल्याने महिला त्याला घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. याबाबत माहिती मिळाल्यावर आरोपी पुन्हा महिलेकडे गेला. त्याने माफी मागून पुन्हा असे करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर तो तिला आपल्यासोबत गावी पोहराबंदी येथे घेऊन आला.