अमरावती -उंचच उंच टॉवर आणि त्यामध्ये जोडलेल्या जाड तारांमधून वाहणारा उच्च विद्युत दाबाचा प्रवाह अमरावती शहरात कोणत्याही नागरी भागात कुठल्याही घरावरून जात नाही. शहरालगत चारही बाजूने वेढलेल्या शेतशिवारातून उच्च विद्युत दाबाचा प्रवाह नेला जात आहे. आता या काही शेतशिवारांचे रुपांतर नवीन ले-आऊटमध्ये झाले आहे. नव्याने विकसीत होणाऱ्या परिसरातून उच्च विद्युत दाबाचा प्रवाह गेलेला आहे. मात्र, या परिसरातील घरांचे अंतर या तारांपासून दूरच आहे. त्यामुळे उच्च विद्युत दाब अमरावती शहरातून सुरक्षितपणे प्रवाहित होत आहे.
हेही वाचा -वाझे-हिरेन भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर; हत्याकांडसंदर्भात समोर आले मोठे खुलासे
काय आहे उच्च विद्युत दाब ? -
अमरावती शहरात एकूण 14 विद्युत उपकेंद्रे आहेत. वीज वितरण केंद्रांवरून प्रत्येक उपकेंद्रांवर उच्च विद्युत दाब प्रणालीद्वारे 11 हजार केव्ही वीज पाठविली जाते. पुढे या उपकेंद्रांवरून विविध भागांतील डीपीवर वीज पाठवली जाते. या डीबीवरील ट्रान्सफॉर्मरद्वारे 11 हजार केव्हीचे 440 केव्हीमध्ये परिवर्तन केले जाते. यानंतर डीपीवरून घरगुती वापरसासाठी वीज जाते. सिंगल फेज लाईन 230 केव्हीची, तर थ्री फेज लाईन 440 केव्हीची असते. अशा प्रकारे वीज वितरण केंद्रांवरून उच्च विद्युत दाब वाहिनी नागरी भागात कमी तीव्रतेने पुरविली जाते.
अमरावती शहरात उच्च विद्युत दाब प्रवाहाचे भय नाही -
उच्च विद्युत दाब प्रवाहाचा अमरावती शहारातील कुठल्याही नागरी वसाहतीला धोका नाही. शहरी भागात 99 टक्के उच्च विद्युत दाब प्रवाह अंडरग्राऊंड आहे. ज्या काही नव्या भागात उच्च विद्युत दाब प्रवाह गेलेला आहे, तिथे सुरक्षित अंतरावरच घर किंवा इतर कोणत्याही बांधकामाला परवानगी मिळते, असे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
हेही वाचा -शरद पवार १ एप्रिलपासून उतरणार पश्चिम बंगालच्या रणांगणात
उच्च विद्युत दाब प्रवाहाच्या ठिकाणी बांधकाम परवानगीला नकार -
अमरावती शरह उच्च विद्युत दाबापासून सुरक्षित आपल्या शहरात उच्च विद्युत दाब प्रवाहाची फारशी अडचण नाही. यासंदर्भात महापालिकेची भूमिका ही उच्च विद्युत दाब प्रवाह जात आलेल्या ठिकानालगत कोणत्याही बांधकामाची परवानगी न देणे इतकीच आहे, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडेंनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
वीज अंडरग्राऊंड, खांब मात्र रस्त्यावर - अमरावती शहरातील अनेक भागात उंडरग्राऊंड वीज पुरविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर काही भागात काम सुरू आहे. ज्या भागात अंडरग्राऊंड वीज नेण्यात आली आहे, त्या भागात वीज वाहून नेणारे जुने खांब आहे तसेच उभे आहेत. या खांबांची विल्हेवाट लावण्याबाबत जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागण्यात आला आहे. पालकमंत्री याबाबत पाठपुरावा करीत आहेत, असे महापौर चेतन गावंडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. अमरावतीतील उच्च विद्युत प्रवाहाच्या तारा वीज खांबांवर आता खासगी केबलचे जाळे -
अमरावती शहरात आता अनेक भागात अंडरग्राउंड वीज पुरवठा होत आहे. यामुळे शहर तारांपासून हळूहळू मुक्त होत आहे. पण, पथदिव्यांच्या खांबांवर खासगी केबलेचे जाळे पसरल्याचे चित्र दिसत आहे. नागरी भागात आजही घरातील मीटरपर्यंत वायर टाकूनच खांबावरून वीज घेतली जात आहे. अशा वायर आणि डिश टीव्हीच्या केबलचे जाळे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. हा प्रकार तारेविना छान दिसणाऱ्या खांबच्या सौंदर्यावर डाग लावणारा ठरतो आहे.
हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला व परमबीर सिंग यांच्याविरोधात होणार कायदेशीर कारवाई