महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्याच पावसात फुलले चिखलदऱ्याचे सौंदर्य; पर्यटकांसाठी पर्वणी - tourist

शनिवारी आलेल्या जोरदार पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे हिरवे सौंदर्य पुन्हा फूलले आहे. शनिवारी झालेल्या पावसाने चिखलदऱ्याचे सौंदर्य बहरले असून पर्यटकांची पावले चिखलदऱ्याकडे वळायला लागली आहे.

चिखलदरा

By

Published : Jun 30, 2019, 5:16 PM IST

अमरावती - थंड हवेचे ठिकाण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याची राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने एक वेगळीच ओळख आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची पावसाची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली असून, शनिवारी आलेल्या जोरदार पावसामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे हिरवे सौंदर्य पुन्हा फूलले आहे.

सध्याच्या पावसाने चिखलदरा न्हाहला अजून, आता पर्यटकांची पावले हळूहळू चिखलदऱयाकडे वळू लागली आहे. रविवारी सकाळी चिखलदऱ्यातील रस्ते धुक्यात हरवले होते. काही दिवसांआधी पाऊस नसल्याने चिखलदऱ्यात पर्यटकांचा ओघ कमी झाला होता त्यामूळे चिखलदऱ्याचे रस्ते ओस पडले होते. पण शनिवारी झालेल्या पावसाने चिखलदरा परत बहरला आहे.

पावसाने बहरला चिखलदरा


निसर्गाचा अदभुत खजिना मेळघाटला लाभला आहे. समुद्र सपाटीपासून एक हजार पेक्षा मीटर जास्त उंचीवर असलेल्या घनदाट जंगलात वसलेले चिखलदरा पर्यटन क्षेत्र हे स्वत:तच एक वेगळी ओळख निर्माण करून आहे. दऱ्या खोऱ्यातून निघणारी वाट, दाट धूके, रिमझिम बरसणाऱ्या सरी, दूरवर पसरलेला कंच हिरवा डोंगर, हजारो फूट उंचीवरून दरीत कोसळणारे धबधबे, आणि दूरवर दृष्टीस पडणारे सुंदर विहमंग दृष्य पाहून मन आल्हाददायक होते. पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात हरखून जातात. सांगावे तितुके कमीच असे हे सुंदर दृष्य मनी साठवत पर्यटक आनंदाने परतीचा प्रवासाला लागतात.


यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी चिखलदऱ्याने मात्र आपले सौंदर्य फुलवायला अजिबात वेळ लावला नाही. शनिवारचा पाऊस येताच रविवीरी चिखलदऱ्यातील रस्ते, डोंगर, दऱ्या धुक्यात हरवलेले होते. आता पर्यटकाची रिघ लवकरच चिखलऱ्यात नेहमीप्रमाणे दिसायला मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details