अमरावती - अमरावती जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मुसळधार पाऊस कोसळला ( Heavy rain fall ). त्यामुळे पेढी नदीला पूर आला होता. आलेल्या या पुरामुळे अमरावती चांदूर-बाजार मार्ग बंद झाला ( Amravati-Chandurbazar road closed ) असून या मार्गावरील गावांमध्ये पाणी शिरले आहे.
पेढी नदीला पूर -मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आला असून शिराळा, पुसदा, साहूर, नांदोरा, टिंबा, टाकरखेडा, शंभू, या गावांना पुराचा फटका बसला ( villages suffer due to Floods ) आहे. या गावांचा एकमेकांशी संपर्क तूटला ( many villages lost contact ) आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे ( Water seeped into the villages ) ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. शिराळा पुसदा या गावांचा संपर्क तुटला असून साहू या गावापासून अमरावती शहरात येण्यासाठीचा 30 किलोमीटरचा रस्ता बंद झाला आहे. ग्रामस्थांना मोठा फेरा घेऊन सुमारे 75 किलोमीटर अंतर पार करून अमरावतीला यावे लागत आहे. परिवहन महामंडळाच्या काही गाड्या देखील या गावांमध्येच अडकून आहे.