महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाशी लढण्यासाठी अमरावती कारागृह सज्ज; अधीक्षक कांबळेंची माहिती

कारागृहातील कैद्यांशी कोणाचाही संपर्क येत नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊ शकत नाही. तरी आम्ही काळजी घेत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली आहे.

amravati central jail
कोरोनाशी लढण्यासाठी अमरावती कारागृह सज्ज; अधीक्षक कांबळेंची माहिती

By

Published : Mar 17, 2020, 2:13 AM IST

अमरावती -कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही दक्षता बाळगण्यात येत आहे. कारागृहामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून, कैद्यांनी घाबरू नये, असे आवाहन करण्यात आले असल्याचे कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली. कारागृहात कोणी आजारी पडत असेल तर त्यांच्यासाठी वेगळा वॉर्ड तयार केल्याचेही कांबळे म्हणाले.

कोरोनाशी लढण्यासाठी अमरावती कारागृह सज्ज; अधीक्षक कांबळेंची माहिती

हेही वाचा -CORONA : तर घरातच विलगिकरण करण्यात आलेल्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मदत

अधीक्षक कांबळे म्हणाले की, खबरदारी म्हणून कैद्यांची संपूर्ण आरोग्य चाचणी घेतली जात आहे. कोरोनाबाबत कुठलाही गैरसमज किंवा अफवा पसरू नये, यासाठी कारागृहातील बंदीमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. बराकींचीही स्वच्छता केली जात आहे. कैद्यांशी कोणाचाही संपर्क येत नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊ शकत नाही. त्यामुळे तितकेसे घाबरण्याचे कारण नसले तरी, जे नवे कैदी पोलीस प्रशासन कारागृहात पाठवत आहेत. त्या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना कारागृहात पाठवायला हवे, असेही कांबळे म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details