महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती आगारातील बसवर डेटाॅलचा मारा; प्रवाशांना स्वच्छतेच्या सूचना - amravati corona update

अमरावती जिल्हातील बस आगारात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रत्येक बस आतून निर्जंतूक केल्या जात आहे . विशेष करून येणार्‍या प्रत्येक प्रवाश्याला अधिकारी व कर्मचारी आवर्जून हँड सॅनीटाईझर देऊन जंतू मुक्त हात करायला सांगतले जात आहे.

amravati corona update
अमरावती आगारातील बसवर डेटाॅलचा मारा; प्रवाशांनाही हँड सॅनीटाईझर

By

Published : Mar 19, 2020, 4:43 AM IST

अमरावती -बस आगारात संपूर्ण बसेस वर डेटॉलचा मारा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांनाही हॅड सॅनीटाईझर देऊन हात स्वच्छ करायला सांगितले जात आहे. कोरोना विषाणूच्या देशातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टुर्स-ट्रॅव्हल्सच्या मालकांनी प्रवासी बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना निर्जंतुकीकरणाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

अमरावती आगारातील बसवर डेटाॅलचा मारा; प्रवाशांनाही हँड सॅनीटाईझर

हेही वाचा -लोकांनी कोरोनाला घाबरलेच पाहिजे - जयंत पाटील

अमरावती जिल्हातील बस आगारात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रत्येक बस आतून निर्जंतूक केल्या जात आहे . विशेष करून येणार्‍या प्रत्येक प्रवाश्याला अधिकारी व कर्मचारी आवर्जून हँड सॅनीटाईझर देऊन जंतू मुक्त हात करायला सांगतात. तसेच प्रवाश्यांची गर्दी होणार नाही याची काळजीही आगारामध्ये घेतली जात आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती मिळावी याबाबतीत तसेच दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबींचे पालन व्हावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details