अमरावती -अमरावती व बडनेरा हे दोन बस आगार सोडून उर्वरित परतवाडा, दर्यापूर, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी आणि चांदूर बाजार या बस आगारांमधून आज सकाळपासून वाहतूक प्रवासी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांसह ही बस वाहतूक करण्यात आली आहे. सहा आगारांमधून नियोजित ५४७ बस फेऱ्या करण्यात येणार असून यासाठी ११२ चालक आणि वाहक त्यांची नियुक्ती विभागामार्फत करण्यात आली. मात्र, आज अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती बघितली तर एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता.
अमरावती जिल्ह्यातील बस डेपोत शुकशुकाट - lockdown relaxation in amravati
सहा आगारांमधून नियोजित ५४७ बस फेऱ्या करण्यात येणार असून यासाठी ११२ चालक आणि वाहकांची नियुक्ती विभागामार्फत करण्यात आली. मात्र, आज अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती बघितली तर एसटी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता.
डेपोत प्रवासी नसल्याने सकाळच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आला. केवळ तालुक्यातील तालुक्यात एसटी बस धावणार असल्याने इतर तालुक्यात जाण्याची मुभा प्रवाशांना नाही. त्यामुळे डेपोत प्रवाशी नव्हते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी बसण्याची मुभा आहे. बसमध्ये प्रवशांना बसण्याच्या आधी सर्वांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व डेपोत एसटी बस सज्ज आहेत. मात्र, बसमध्ये प्रवासी नसल्याने एकही बस धावली नाही. त्यामुळे एसटी बस विभागाला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.