अमरावती - तिवसा शहरातील अनेक रस्त्यांनी नागरिकांना चिखल तुडवत जावे लागत असल्याने व अनेक ठिकाणी डबके साचल्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी 'चिखला'त बसून आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी तिवसा नगरपंचायतविरुद्ध आंदोलन केले आहे.
अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन हेही वाचा - भरचौकात महिलेची प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी सायकल रिक्षातून नेल्याने मृत्यू
पावसाळा समाप्त होत आला असतानाही शहरातील अनेक रस्त्याची सुधारणा नाही. त्यासाठी मुरमाचे पैसे येऊनही अनेक ठिकाणी मुरूम न टाकल्याने अक्षर: रहदारीच्या रस्त्यावर मोठमोठे डबके साचले आहेत. नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर भाजप कार्यकर्त्यांनीच रस्त्याच्या मध्यभागीच असलेल्या डबक्यात बसून वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.
हेही वाचा - मुंबईतील लोहार चाळीतील इमारत कोसळली; व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - आवक कमी असल्याने कांदा वधारला