महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत लॉकडाऊन काळात भाजपच्या 'सेवाभावाची प्रचिती', कार्यकर्त्याच्या कार्याला प्रसिद्धी देण्याचा उपक्रम - अमरावती कोरोना काळातील भाजप कार्यकर्त्यांच्या कामावर पुस्तक

लॉकडाऊनच्या काळात शहरातील गरीब, गरजू तसेच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या अनेक सर्वसामन्य व्यक्तींच्या मदतीला आमच्या भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर होते. या काळात सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेताना आमचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर स्वतः संक्रमित झाले होते, असे डॉ. सुनील देशमुख यावेळी म्हणाले.

amravati bjp published book on work of party workers in corona lockdown
अमरावतीत लॉकडाऊन काळात भाजपच्या 'सेवाभावाची प्रचिती'

By

Published : Sep 21, 2020, 4:44 PM IST

Updated : Sep 21, 2020, 5:04 PM IST

अमरावती -कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अडचणीत असणाऱ्या जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या सेवेला प्रसिद्धी देणाऱ्या 'सेवाभावाची प्रचिती' या पुस्तकाचे सोमवारी माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकाचे वाटप आता सर्वत्र केले जाणार आहे.

अमरावतीत लॉकडाऊन काळात भाजपच्या 'सेवाभावाची प्रचिती', कार्यकर्त्याच्या कार्याला प्रसिद्धी देण्याचा उपक्रम
अमरावती शहर भाजप कार्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात शहरातील गरीब, गरजू तसेच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या अनेक सर्वसामन्य व्यक्तींच्या मदतीला आमच्या भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर होते. लॉकडाऊन काळात सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेताना आमचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर स्वतः संक्रमित झाले होते, असे डॉ. सुनील देशमुख यावेळी म्हणाले. परिस्थिती आता गंभीर आहे सगळ्यांनी आता काळजी घेण्याची गरज असल्याचेही डॉ. सुनील देशमुख म्हणाले.यावेळी महापौर चेतन गावंडे, भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर, उपमहापौर कुसुम साहू, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, पुस्तकाचे संपादक डॉ. रवींद्र कोल्हे, दीपक पोहेकर, सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते.
Last Updated : Sep 21, 2020, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details