अमरावती - महाराष्ट्र्रात यावर्षी 5 नोव्हेंबरपासून १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षक आणि पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, तर बर्डमॅन ऑफ इंडिया डॉ. सलीम अली यांची 12 नोव्हेंबरला जयंती असते. याचे औचित्य साधून या पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीच्या वडाळी येथील बांबू गार्डन परिसरात उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे प्रमुख डॉ. जयंत वडतकर यांच्याहस्ते पक्षी निरीक्षण उपक्रमाचे उद्घाटन झाले.
वडाळीच्या जंगलात विविध पक्षांचा किलबिलाट -
अमरावती शहराला लागूनच असणाऱ्या वडाळी जंगलात वडाळी तलाव, फुटका तलाव आणि भवानी तलाव आहे. पानवठयांनी समृद्ध असणाऱ्या या परिसरात गुज, गडवाल या स्थलांतरित पक्षांसह करकोचा, पोपट, बदक, तलवार बदक, जांभळ्या पान कोंबडया, तुतारी, जकाणा, धोबी, चक्रवाक, धिवर, टिटवी, आरली, पणचिरा, कुरव, पाण्यात टिबुकली, सुरच,शराटी, तपस असे विविध पक्षी आहेत. थंडीमुळे अनुकूल वातावरण तयार झाल्याने जंगलात आता पक्षांचा किलबिलाट वाढला आहे.
थंडीमुळे स्थलांतरित पक्षांची सांख्य आणखी वाढणार -