अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्याचे कृषी विभाग कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हे रात्रभर उघडेच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी आपल्या कर्तव्याशी किती बेजबाबदारपणे वागतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे; अमरावतीच्या धामनगाव रेल्वेतील प्रकार - door
या कार्यालयात दोन मंडळ कृषी अधिकारी व वीस कृषी सहायक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची कागदपत्रे येथे असताना हे कार्यालय उघडे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाचे कार्यालय रात्रभर उघडे
या कार्यालयातील वीज, फॅन रात्रभर सुरू होते. ऑफिसचे दरवाजे खिडक्याही उघड्या होत्या. या कार्यालयात दोन मंडळ कृषी अधिकारी व वीस कृषी सहायक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची कागदपत्रे येथे असताना हे कार्यालय उघडे सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहेत. या प्रकरणी संबधित अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.