अमरावती - तिवसा तालुक्यातील फतेपूर येथून शिवणगाव फाट्यावर येताना एका भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान शिवणगाव फाट्यावर घडली. घटनेनंतर चारचाकी चालक फरार झाला आहे. अतुल खडसे (वय-२७) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
अमरावतीत कारच्या धडकेत युवक जागीच ठार हेही वाचा - पैशाचा हिशोब देत नसल्याने चारित्र्यावर संशय घेत दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून
अतुल खडसे हा फतेपूर येथील रहिवासी असून त्याचे शिवणगाव स्थानकावर पानटपरीचे दुकान आहे. या दुकानावर अतुलच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान शिवणगाव फाट्यावर दुचाकीवरून (एम एच २७, एम ५६१७) येत असताना अमरावती वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.
यामध्ये अतुलला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांना मिळताच त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले व पंचनामा केला.
हेही वाचा - २० तास काम करणार, पण राज्य चुकीच्या हातांत जाऊ देणार नाही - पवार