महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू - नितीन गवळी - आम आदमी पार्टी न्यूज

वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू, अशा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तथा चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी शासनाला दिला आहे.

aam aadmi party on electricity bill
वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू - नितीन गवळी

By

Published : Jan 24, 2021, 9:34 AM IST

अमरावती -वीज कापू नका अन्यथा आम्ही पुन्हा जोडणी करू, अशा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री तथा चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी शासनाला दिला आहे. तसेच वेळ पडल्यास वीज तोडणी प्रकरणी मुख्यमंत्री निवासाबाहेर आम आदमी पार्टीतर्फे राज्य संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी तयार ही राहणार असल्याचे नितीन गवळी यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात लॉकडाउनमुळे जनतेचा रोजगार हिरावला गेला होता. मुख्यत्वे घरगुती आणि लघु उद्योजक ग्राहकांना या लॉकडाउनचा फटका बसला असल्याने त्यांची वीज बिल थकबाकी आहे. त्यांच्या खिशात पैसे नसतांना त्याची वीज कापणे म्हणजे सावकारीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करूनच ३० टक्के वीज सवलतीचे आश्वासन वचननाम्याद्वारे राज्यातील जनतेला दिले होते. मग आता शब्द न पाळता कनेक्शन कट करण्याची धमकी दिली जात आहे. यामागे कुणाचा दबाव आहे हे त्यांनी जनतेस सांगावे. सरकारने कोरोना संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे न राहता एप्रिलमध्ये वीज दरवाढ केली. पण जनतेच्या दबावामुळे ऊर्जामंत्री यांनी दिवाळीच्या तोंडावर सवलतीची घोषणा केली आणि नंतर घुमजाव केले. त्यांनाही शब्द फिरवावा लागला. यामागे कोणत्या शक्ती आहेत हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.

नितीन गवळी बोलताना...
दिल्लीत आप सरकार गेले काही वर्षे २०० युनिट वीज मोफत देत आहे. महाराष्ट्रात सरकारची भूमिका अडेलपणाची आहे. खरेतर सार्वजनिक दिवाबत्ती-पाणीपुरवठा व इतर शासकीय सेवांची वीजबिल थकबाकी मोठी आहे. तसेच उच्चदाब व बेकायदेशीर वीज वापराचा/ गळतीचा बोजा पण मोठा आहे. ती रक्कम वसूल न करता सामान्य ग्राहकांच्या अंगावर तो बोजा टाकणे अयोग्य आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री परवाना शुल्कात ३६० कोटींची सवलत दिली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाउन काळातील टोल वसुली झाली नाही म्हणून टोल कंत्राटदारांना भरपाई दिली आहे. 'सरकारची ही धोरणे उफराटी आहेत व सामान्य जनतेच्या फसवणूक करणारी आहेत. त्यामुळे ज्या जनतेच्या खिशात पैसा नाही, त्या जनतेची वीज कापल्यास आपचे कार्यकर्ते पुन्हा वीज जोडणी करतील, असा इशारा आपने दिला आहे.
या सरकारने ही वीज खंडित करण्याची जनविरोधी कृती चालू ठेवल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर आपचे राज्य संयोजक रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करू असेही आपचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details