अमरावती- "24 तारखेनंतर महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार आहे. गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, अर्थमंत्रीही आमचेच असणार आहेत. अन् ईडीची पहिली चौकशी ही आदित्य ठाकरेंची होणार," असा खणखणीत ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी दिला. अमरावतीच्या नेरपिंळाई गावात ते आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
...तर ईडीची पहिली चौकशी आदित्य ठाकरेंची होणार- अमोल मिटकरी - akol mitkari amravti news
आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी भाजप एकवटीली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात फक्त दहा रुपयांत थाळी आहे. मात्र, त्यात अन्न नाही. आम्ही भिकारी नाहीत आम्हाला नको ती थाळी.
हेही वाचा-...तर एअर इंडियाचा विमान इंधन पुरवठा सरकारी तेल कंपन्या थांबविणार
आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी भाजप एकवटीली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात फक्त दहा रुपयांत थाळी आहे. मात्र, त्यात अन्न नाही. आम्ही भिकारी नाहीत आम्हाला नको ती थाळी. सध्या भारतीय जनता पक्षाकडे मुद्दे नाही. त्यांनी महाजनादेश यात्रा काढली तिची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरितून केली. या पापी लोकांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीच दर्शन केले. महाजनादेश यात्रेत लोकांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले ते पण कोंबड्या, शाई फेकून. यांनी केलेले पाप धुण्यासाठी नाशिकला जनादेश यात्रेचा समारोप केला. भाजप सेनेच्या वचननाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच नाही. पाच वर्षात या सरकारला काहीच करता आलं नाही. शरद पवार कृषी मंत्री असताना धानाला अनुदान होते, अशी टीका मिटकरी यांनी केली.