अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा-धारणी रस्त्यावरील घटांग गावाजवळ 21 जणांचे स्वॅब घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. पण, रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
अमरावतीमध्ये 21 जणांचे 'स्वॅब' घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली - amravati latest news
अमरावतीतील घटांग गावाजवळ 21 जणांचे स्वॅब घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मेळघाटमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना केली जात आहे. धारणी येथील सेंटरवर कोरोना संशयित लोकांचे घशातील स्वॅब घेण्यात येत असून त्यांचे नमुने अमरावतीला तपासणीसाठी नेण्यात येतात. 21 जणांचे स्वॅब घेऊन ही रुग्णवाहिका अमरावतीकडे जात होती. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे रुग्णवाहिका उलटली. या अपघातात स्वॅबही वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे.
हेही वाचा -विशेष : 'धोंडी-धोंडी पाणी दे दाय दाना पिकू दे'; लॉकडाऊनमुळे भराडी समाजावर उपासमारीची वेळ...