महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amba Rukhmini festival : विदर्भाच्या पुरातन राजधानीत रंगणार अंबा-रुख्मिणी महोत्सव, १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित - अंबा रुख्मिणी महोत्सव

विदर्भाच्या पुरातन राजधानीचा (ancient capital of Vidarbha) अंबा-रुख्मिणी महोत्सव- २०२२ (Amba Rukhmini festival) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा महोत्सव १०, ११ व १२ नोव्हेंबर दरम्यान पार (November 10 to 12) पडणार आहे.

Amba Rukhmini festival
अंबा-रुख्मिणी महोत्सव

By

Published : Nov 6, 2022, 4:50 PM IST

अमरावती : विदर्भाच्या पुरातन राजधानीचा (ancient capital of Vidarbha) अंबा-रुख्मिणी महोत्सव- २०२२ (Amba Rukhmini festival) ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. हा महोत्सव १०, ११ व १२ नोव्हेंबर दरम्यान (November 10 to 12) पार पडणार आहे. यात बहारदार कार्यक्रमांची मेजवानी यात्रेकरूंसाठी असणार आहे. एवढेच नव्हे तर या व्यासपीठावर महाराष्ट्रातील अनेक सिलेब्रिटींची धूम राहणार आहे. त्यामुळे या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अंबा-रुख्मिणी महोत्सव सल्लागार समिती, उत्सव समिती व महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन :या महोत्सवाचा उदघाटन समारंभ दिनांक १० नोव्हेंबर रोजी होणार असून; याचे उदघाटन जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर अध्यक्षस्थानी क्षेत्र कौडण्यपूर येथील रुख्मिणी विदर्भपीठाचे जगद्गुरू रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.


हे मान्यवर राहतील उपस्थित :कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व फिनिक्स अकादमी वर्धाचे संचालक नितेश कराळे यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अमरभाऊ काळे, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळ अमरावतीचे अध्यक्ष दिनेशजी बूब, जिल्हा परिषद अमरावतीच्या माजी सभापती पूजाताई संदीप आमले, तिवसा पंचायत समितीच्या सभापती रोशनी मुकुंद पुनसे, तिवसा पंचायत समितीच्या सदस्य व माजी सभापती शिल्पाताई रविंद्रजी हांडे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, कीर्तनकार ह. भ. प. संजय महाराज ठाकरे, यात्रा अधीक्षक राहुल कांबळे, सरपंच रुचिताताई पंढरी चव्हाण, उपसरपंच श्रीरामजी केवदे यांची उपस्थिती राहणार आहे. तर सायंकाळी ६. ०० वाजता ह. भ. प. संतोष महाराज भालेराव (आळंदीकर, पुसद) यांचा विनोदी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून; या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पातसे व ह. भ. प. पंकज महाराज महल्ले यांची उपस्थिती राहणार आहे.


बहारदार कार्यक्रमांची मेजवानी :दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता ग्राम जोडो अभियान अंतर्गत 'स्वच्छ गाव- सुंदर गाव' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला जगद्गुरू रामानंदाचार्य रामानंदाचार्य श्री रामराजेश्वराचार्यजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कौडण्यपूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष भारत ढोणे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर सकाळी ११ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय अमरावती द्वारा रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून; या कार्यक्रमाला डॉ. संदीप निंभोरकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या सायबर विभागामार्फत सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहे. या कार्यशाळेला पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता कराओके गीत गायन या सुमधुर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अमरावती ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, व चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. सुनील किनगे (पोलीस निरीक्षक) यांची उपस्थिती राहणार आहे.



विदर्भाच्या कलावंताचा होणार सत्कार :त्यानंतर सायंकाळी ५ वाजता 'सत्कार विदर्भाच्या कलावंतांचा' या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'चला हवा येऊ द्या फेम व सिने अभिनेता भारतजी गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर विदर्भ कॉमेडी किंग अनिकेत देशमुख, विदर्भ कॉमेडी क्वीन श्रुतिका गावंडे, यु ट्यूब स्टार बिपीन माहुरे, श्रीवल्ली मराठी फेम विजय खंडारे आणि व्हीआयपी रॅपर, झुंड चित्रपट फेम विपीन तातड या कलाकारांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री रामराजेश्वराचार्यजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिलजी बोन्डे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिताताई दिघडे, आर्वीचे आमदार दादारावजी केचे, अजयजी पांडे (तिवसा विधानसभा), कॉटनकिंग अमरावतीचे संचालक अमोल चवने, शहिद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय कुऱ्हा चे अध्यक्ष विवेक बिंड यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


एकता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन :दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजता भव्य एकता मॅरेथॉन (विदर्भ क्रॉस कंट्री स्पर्धा) चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन जय हिंद क्रीडा मंडळ चांदुर रेल्वे चे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्याहस्ते संपन्न होणार आहे. तर अमरावती महानगरपालिका अभियंता दिनेश हंबर्डे, पी. ई. एफ. आय. विदर्भ चाप्टर डॉ. उमेश राठी, अमरावती ऍथलेटिक्स असोसिएशनचे चे सचिव अतुल पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बॉडी बिल्डिंग वेट लिप्टिन्ग चेअरमॅन डॉ. कल्याण मालधुरे, कुऱ्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप बिरांजे, दुय्यम ठाणेदार गणेश सपकाळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

भव्य महिला मेळावा चे आयोजन: दुपारी १२ वाजता भव्य महिला मेळावा चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रीतीताई देशमुख, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध निवेदिका व व्याख्यात्या क्षिप्राताई मानकर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी वर्षाताई भाकरे, जिल्हा परिषद सदस्य गौरीताई देशमुख, एल. सी. आर. पी. संगीताताई पवार, मारडा ग्रामपंचायत सरपंचा रविनाताई अंबुरे, कौडण्यपूरच्या सरपंचा रुचिताताई पंढरी चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. तर दुपारी ४. ०० वाजता सुप्रसिद्ध गायक कैलास लोखंडे व संच यांचा बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६. ०० वाजता या महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम होणार असून; यावेळी अध्यक्षस्थानी नरेंद्र महाराज पुरी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रंजनसेन शेंडे (कुऱ्हा), संदीपजी आमले (चेनुष्टा), तिवसा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन अळसपूरे, तिवसा खरेदी विक्री संघाचे संचालक रविंद्रजी हांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच चे अध्यक्ष अमर वानखडे, तिवसा विधानसभा युवक काँग्रेस चे माजी अध्यक्ष रितेश पांडव, माजी उपसभापती लुकेश केने यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या विदर्भस्तरीय महोत्सवामध्ये आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन अंबा-रुख्मिणी महोत्सव सल्लागार समिती, उत्सव समिती व महिला समिती च्या वतीने करण्यात आले आहे. Amba Rukhmini festival

ABOUT THE AUTHOR

...view details