महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैध दारुविक्रीविरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून धडक मोहीम, 82 आरोपींना अटक - amravati illegel-liquor

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी लॉकडाऊन असल्यामुळे अनुज्ञप्तीधारकांकडून मद्यविक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी  उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडली आहे.

http://10.10.50.85//maharashtra/22-April-2020/mh-amr-07-82-drunkere-arrested-vis-7205575_22042020201729_2204f_1587566849_351.jpg
http://10.10.50.85//maharashtra/22-April-2020/mh-amr-07-82-drunkere-arrested-vis-7205575_22042020201729_2204f_1587566849_351.jpg

By

Published : Apr 23, 2020, 9:07 AM IST

अमरावती- लॉकडाऊनच्या काळात अवैध मद्यनिर्मिती व विक्री रोखण्यासाठी एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तर दुसरीकडे, राज्य नशाबंदी मंडळाने अवैध मद्यविक्रीच्या दुष्परिणामांच्या माहितीचा प्रसार करत व्यसनमुक्तीसाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे.

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी लॉकडाऊन असल्यामुळे अनुज्ञप्तीधारकांकडून मद्यविक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडली आहे. विभागाचे अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी जाऊन मोहीम राबवत आहेत. त्यानुसार गत महिन्यात जिल्ह्यात हातभट्टीसंबंधी 115 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 75 आरोपींना अटक करण्यात आली आहे. देशी मद्यासंबंधी दाखल गुन्ह्यांची संख्या 6 असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परराज्यातून आलेल्या मद्यासंबंधी 2 गुन्हे दाखल असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गत महिन्यात 123 गुन्ह्यांमध्ये 82 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क अधिक्षक राजेश कावळे यांनी दिली. अवैध दारूमुळे जीवितहानी होण्याची जास्त शक्यता असते. अत्यंत घातक पदार्थ वापरून अवैध दारू बनविण्यात येते. त्यामुळे जिविताची हानी होऊन संपूर्ण कुटुंबालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे नागरिकांनीही अवैध दारू पिऊन आपले जीवन धोक्यात घालू नये. लॉकडाऊनच्या काळात संयम आणि शिस्त पाळावी, असे आवाहनही श्री. कावळे यांनी केले.

दुसरीकडे, या काळात व्यसनमुक्तीचे प्रमाण वाढविण्यासाठी नशाबंदी मंडळाकडूनही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्य नशाबंदी मंडळाकडून व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून, या काळात नागरिकांनीही संयम व शिस्तीचे पालन करावे. गावठी किंवा अवैध मद्य पिऊन आपले जीवन उध्वस्त करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

व्यसनाची समस्या असणाऱ्यांना व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. या काळात नागरिकांनीही अवैध मद्य पिऊन आपले जीवन उद्ध्वस्त करू नये. व्यसन ही आपली समस्या आहे, तर समुपदेशनासाठी संपर्क करावा. लॉकडाऊनच्या या काळात मद्य किंवा इतर कोणत्याही व्यसनांवर अवलंबून असणा-या व्यक्तीमध्ये ‘विड्रॉवल सिम्पटम्स’ दिसून येतात. हात थरथरणे, अस्वस्थ वाटणे, श्वास फुलणे, उलट्या, चक्कर येणे, आभास होणे आदी लक्षणे यात दिसून येतात. अशा व्यसनी व्यक्तीला समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते. योग्य समुपदेशन मिळाल्यास व्यसनी व्यक्ती स्वत:ला या परिस्थितीत सावरून व्यसनमुक्त होऊ शकतो. त्याचसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. व्यसनी व्यक्तीना व्यसनापासून मुक्त होण्यासाठी हे समुपदेशन उपयुक्त असून, या हेल्पलाईनचा वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्या व्यक्तीस या समुपदेशनाचा लाभ मिळण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details