अमरावती- छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आज जिल्ह्याच्या महिला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा जाळण्यात ( Yashomat Thakurs statue set fire ) आला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा अवमान केल्याचा प्रकार घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन असे चुकीचे कृत्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आज शहर काँग्रेसच्यावतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शहरात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी
गत चार-पाच दिवसांपासून अमरावती शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करून अशांतता पसरवण्याचे काम केले जात आहे. काही लोकांनी रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर स्थापन केला. महापालिकेत कुठल्याही स्वरूपाची परवानगी न घेता स्थापन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनानेही अंधारातच ( Chatrapati Shivaji Statue controversy ) काढला. त्या संपूर्ण प्रकारानंतर अमरावती शहरात वेठीस धरण्याचा प्रकार घडला. शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी पोलिसांनी शांतता भंग करणार्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत ( Amaravati Shahar congress president Babalu Shaikh ) यांनी केली आहे.
हेही वाचा-Remove Chhatrapati Statue In Daryapur : पुतळ्यावरुन राजकारण तापले, दर्यापुर शहरात तणावाचे वातावरण
संबंध नसतानाही पालकमंत्र्यांचा विरोध खपवून घेतला जाणार नाही
गेली पाच दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावती शहरात गोंधळ सुरू आहे. त्याचा आम्ही निषेध नोंदवितो. खरेतर राजा उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी तीन वर्षांपासून परवानगी घेण्यात आली असल्याचे युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने सांगण्यात येत आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव महापालिकेच्या आमसभेत आलेला नाही. केवळ शहरातील वातावरण बिघडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप बबलू शेखावत यांनी केला.