अमरावसी - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना अमरावतीकरांनी राजकमल चौक तेथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारो अमरावतीकर उपस्थित होते. यापुढे १४ फेब्रुवारी हा दिवस पाश्चिमात्य व्हॅलेन्टाईन डे नव्हे तर हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जावा, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
यापुढे १४ फेब्रुवारी 'व्हॅलेन्टाईन डे' नाही तर 'हुतात्मा दिवस'; अमरावतीकरांचा संकल्प
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना अमरावतीकरांनी राजकमल चौक तेथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारो अमरावतीकर उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त सैनिकांसह पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त सोळंके, सातव यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, माजी आमदार रावसाहेब शेखावत, उपमहापौर संध्या टिकले, माजी महापौर मिलिंद चिमटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी भाजप हे शहर अध्यक्ष जयंत देहणकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत वानखडे, भाजपचे नगरसेवक सारस्कार यंचयसह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो सर्वसामान्य अमरावतीकर उपस्थित होते.