अमरावती -विदर्भातील सर्वात मोठे असलेले अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाचे आठवडाभरापूर्वी ३ आणि मंगळवारी आणखी २ दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे आता धरणाच्या १३ दरवाज्यांपैकी पाच दरवाजे हे १० सेमीपर्यंत उघडण्यात आले आहेत. यातून प्रति सेकंदाला ८६ घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - पूर्णा नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले; खासदार नवनीत राणा घटनास्थळी