महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यापारी आणि मजुरांमध्ये वादात शेतकऱ्यांचा माल पडून; अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ - कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते न्यूज

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापाऱ्यांच्या बाजूने की मजुरांच्या बाजूने असा प्रश्न दोन्ही गटांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे.

संचालकाच्या दालनात गोंधळ
संचालकाच्या दालनात गोंधळ

By

Published : Nov 24, 2020, 10:53 PM IST

अमरावती - अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आणि मजुरांमध्ये वाद उफाळून आल्याने दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प आहे. शेतमाल बाजार समितीत येऊन पडला त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी दिवसभर कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळाचे वातावरण होते.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापाऱ्यांच्या बाजूने की मजुरांच्या बाजूने असा प्रश्न दोन्ही गटांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे.


पाच मजुरांवर गुन्हे दाखल
सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत वाद झाला. या वादात परप्रांतीय मजुरांना मारहाण झाल्यावर स्थनिक पाच मजुरांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनी काम बंद ठेवले. मजुरांवर अन्याय होतो. परप्रांतीय मजुरांना महत्व दिले जात झाल्याने मंगळवारी काम बंद ठेवले.

संचालकांच्या दालनात गोंधळ
सलग दोन दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आल्याने व्यापाऱ्यांनी आजच्या बंदचा निषेध नोंदवला. तर स्थनिक मजुरांनी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करा तेव्हाच आम्ही काम सुरू करू अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते यांच्याकडे केली. अनेक शेतकऱ्यांनी बाजार समिती किती दिवस बंद राहणार असा प्रश्न उपसभापतींना केला. व्यापारी, मजूर व शेतकरी एकाच वेळेस बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयावर धडकल्याने संचालकांच्या दालनात गोंधळ उडाला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत गोंधळ
पोलिसांचा बंदोबस्तकृषी उत्पन्न बाजार समितीत उफाळून आलेल्या गोंधळामुळे मंगळवारी बाजार समितीच्या प्रशाकीय कार्यल्यासमोर गाडगेनगर पोलिसांचा बंदोबस्त होता.
बाजार समितीत पोलीस बंदोबस्त
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीव्यापाऱ्यांनी कुठलीही सूचना न देता सोमवारी समिती बंद ठेवली. आज मजुरांनी संप केला. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र आम्ही हे सर्व वाद त्वरित निवारण करीत आहोत, असे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत, असा त्यांनी दावा केला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details