उद्योगमंत्री, उदय सामंत यांची प्रतिक्रिया अमरावती :मंत्रिमंडळ विस्तार करताना बच्चू कडू यांचा गैरसमज होणार नाही, याची काळजी एकनाथ शिंदे घेतील यात शंका नाही. आतापर्यंत अनेकांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नसला, तरी सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
४० आमदारांना योग्य न्याय मिळेल :प्रहार पक्ष आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांचा गैरसमज होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. शिंदे फडणीस सरकारमध्ये पक्ष म्हणून प्रहार आमच्यासोबत आहे. तसेच ते माझे चांगले सहकारी आहेत. आमदार बच्चू कडू यांच्याप्रमाणे आमच्या 40 आमदारांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही.
कोणावरही अन्याय होणार नाही :मंत्रिमंडळ विस्तार करताना शिंदे गटाच्या आमदारांना पूर्ण विश्वासात घेतले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. टेक्सटाईल पार्क योजनेचा तसेच औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रणाचा आढावा घेण्यासाठी सामंत अमरावतीत आले होते.
खातेवाटप निर्णय शिंदेकडे : शिंदे गटाच्या आमदारांना वाईट वागणूक दिल्याचे वृत्त निराधार आहे. मुख्यमंत्री आमचे आहेत, त्यामुळे अनैतिकतेचा प्रश्नच येत नाही. कोणते मंत्रिपद किंवा खाते कोणाला द्यायचे यावर आम्ही चर्चा करत नाही. तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते न देण्याबाबत सामंत म्हणाले की, कोणाला कोणते खाते द्यायचे याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारच्या सूचना देत नाही. या संदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतात अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा -Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका