अमरावती- राज्यात ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची आज सत्ता स्थापन झाली. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच व अन्य ६ मंत्र्यांचा शपथविधी होताच जिल्ह्यात ठिक-ठिकाणी तिन्ही पक्षांनी सार्वत्रिक जल्लोश करत फटाक्यांची आतषबाजी केली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ; अमरावती जिल्ह्यात जल्लोष - ncp celebration Amravati
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज मुबंईच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. त्यामुळे, जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज मुबंईच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. त्यामुळे, जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. कधी काळी शिवसेना नेते काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर तोंडसुख घ्यायचे. मात्र, आज तिन्ही पक्षाचे नेते विजय उत्सवात एकत्र दिसून आले.
हेही वाचा-उपकुलसचिवांनी विद्यापीठाला लावला 39 हजारांचा चुना; कुलगुरुंनी दिले चौकशीचे आदेश