महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rain In Vidarbha : पेरण्या खोळंबल्या, पश्चिम विदर्भात केवळ 45 टक्केच पाऊस पाऊस - विदर्भात पेरण्या खोळंबल्या

यंदा राज्यात मान्सून उशिरा सक्रिय झाला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. मात्र, पश्चिम विदर्भात पावसाने दडी मारली आहे. जून महिना उलटून गेला तरी आतापर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत केवळ ४५ टक्के पाऊस झाला आहे.

Rain In Vidarbha
Rain In Vidarbha

By

Published : Jul 4, 2023, 10:58 PM IST

प्राध्यापक अनिल बंड माहिती देतांना

अमरावती :यावर्षी विदर्भात मानसून हा अरबी समुद्रा ऐवजी बंगालच्या उपसागरातून दाखल झाला. दरवर्षीप्रमाणे पश्चिम विदर्भात चार जुलै पर्यंत सरासरी 179.1 मिलिमीटर पावसाची नोंद व्हायला हवी होती. मात्र, सध्या पश्चिम विदर्भात केवळ 51.5 मिलिमीटर इतकाच पाऊस बरसला आहे. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 37.8 मिलिमीटर पाऊस बरसला असून अकोला जिल्ह्यात 31.6 मिलिमीटर, वाशिम जिल्ह्यात 60.2 मिलिमीटर, अमरावती जिल्ह्यात 60.5 मिलिमीटर, यवतमाळ जिल्ह्यात 64.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत अमरावती विभागात अतिशय कमी प्रमाणात पाऊस बरसला आहे.

पेरण्या खोळंबल्या :विदर्भात मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट करताच काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी आणखी थोडा पाऊस बरसला पेरणीची सरुवात करण्याच्या तयारीत होते. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पावसानेच दगा दिल्याने संपूर्ण पश्चिम विदर्भात पेरण्या खोळंबल्या.

काय म्हणतात हवामान तज्ञ :पश्चिम विदर्भात पावसाने ओढ दिल्याबाबत ईटीव्ही भारतने हवामान तज्ञांकडून कारण जाणून घेण्याच प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी थोड दम धरावा. दमदार पाऊस विदर्भात बरसणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी यांनी दिली आहे.

'या' कारणामुळे खोळंबला होता पाऊस :पश्चिम विदर्भस नव्हे तर, संपूर्ण विदर्भात यावर्षी 50 टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विदर्भात पाऊस पडण्याकरिता बंगालच्या उपसागरात पावसासाठी आवश्यक असलेला दबाव कार्यरत नसल्यामुळे विदर्भात पाऊस पोहोचू शकला नाही. मात्र, आता बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे निर्माण झाले आहे. अरबी समुद्राकडून मान्सूनचे वारे विदर्भाकडे ओढले जाणार असल्याने आता आज चार जुलैपासून विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असल्याचे प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले.

संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज :पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्राध्यापक अनिल बंडे यांनी स्पष्ट केले. सहा, सात जुलैला अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पेरणीसाठी हा पाऊस अतिशय चांगला असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणीला सुरवात करावी असे बंड यांनी म्हटले आहे. तसेच ज्यांच्या शेतात संपूर्ण लागवड झाली असुन अशा शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अतिशय फायदेशीर असल्याचे देखील प्राध्यापक अनिल बंड यांनी सांगितले.

हेही वाचा -Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details