महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Onion Production : 'मूर्ती लहान, कीर्ती महान' फक्त साडेतीनफुटी शेतकऱ्यांनी पाऊण एकर शेतीत चार महिन्यात पिकवला शंभर क्विंटल कांदा

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रावळगाव येथील अक्षय चौरे या शेतकऱ्याने अवघ्या चार महिन्यात शंभर क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले आहे. अक्षयसह त्याची आई रेखा या दोघांचीही उंची साडेतीन फूट असून त्यांनी दिव्यांगत्वावर मात करून शेतात केलेला विक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Onion Production
अक्षय बाबाराव चौधरी

By

Published : Apr 18, 2023, 7:00 PM IST

Updated : Apr 18, 2023, 7:48 PM IST

अक्षय चौधरीने घेतले कांद्याचे बंपर उत्पादन

अमरावती :तुला शेती जमणार नाही, शेतीत काम करणं अभ्यास करणे इतकं सोपं नाही, असे गावातील नागरिक म्हणत होते. मात्र, त्यांच्या अशा बोलण्याने खचून न जाता मी आईसोबत शेती करण्याचा निर्णय घेतला. आज आमच्या तीन एकर पैकी पाऊण एकर शेतात आम्ही अवघ्या चार महिन्यात शंभर क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांने घेतले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात रावळगाव येथील युवक अक्षय बाबाराव अक्षय चौरे सांगतो यांनी हा पराक्रम केला आहे. अक्षयसह त्याची आई रेखा या दोघांच्याही उंची साडेतीन फूट असून त्यांनी दिव्यांगत्वावर मात करून गावात आपल्या शेतात केलेला विक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

अशी आहे अक्षयसह त्याच्या आईची कहाणी :दर्यापूर तालुक्यात राळेगाव हे अगदी छोटेसे गाव आहे. या गावात आईसह राहणारा अक्षय सर्वांनाच परिचित आहेत. या दोघांचीही उंची केवळ साडेतीन फूट इतकी आहे. अक्षयचा जन्म झाल्यावर केवळ तीन महिन्यातच वलगावला राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याच्यासह आईला सोडून दिले होते. तेव्हापासून रेखा चौरे आपल्या मुलाला घेऊन रावळगाव येथे आपल्या माहेरी आल्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना राहण्यासाठी घर, तीन एकर शेती दिली. रेखा चौरे ह्या स्वतः च्या शेतासह दुसऱ्यांच्या शेतात शेतीच्या काम करीत असत. अक्षयचे प्राथमिक शिक्षण राळेगाव येथे झाले. त्यानंतर आसेगाव पूर्णा येथे त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. अचलपूर येथील जगदंबा महाविद्यालयात त्याने कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अक्षयला अर्थशास्त्र हा विषय फार आवडायचा. अमरावती शहरातील वियामी कॉलेज अर्थात विदर्भ ज्ञान संस्था येथे त्याने अर्थशास्त्रात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेतली. एकाच विषयात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेऊन अर्थशास्त्रातील 25 पैकी पंधरा विषय मी शिकलो असे अक्षय बोलताना म्हणाला. आपण दिव्यांग आहोत याबाबत कधीही खंत वाटली नाही. दिव्यांग असल्याने मला गावात कधी कोणी चिडवले नाही. माझे मित्र मला आसेगाव येथील शाळेत त्यांच्या सायकलवर घेऊन जात असत. मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करतो आहे. यासोबतच मी माझ्या घरी सेतू केंद्र देखील चालवतो असे, अक्षय चौरे म्हणाला. अक्षयची आई गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी बनविण्यासाठी मदनिस म्हणून पण काम करते.

कोरोनामुळे वळलो शेतीकडे :मी स्पर्धा परीक्षांचा जोमाने अभ्यास करीत असतानाच कोरोनामुळे अचानक आयुष्यात मोठा बदल घडून आला. भविष्यात उदरनिर्वाहासाठी आपल्याला रोजगाराची गरज आहे, याची जाणीव कोरोना काळात झाली. इतरांकडे चाकरी करण्यापेक्षा आपण आपल्याच शेतात मेहनत घेण्याचा विचार मी केला. त्यावेळी गावातील एक दोन मंडळींनी मला टोकले. तुला शेती जमणार नाही अशा शब्दात हिणवले. त्या व्यक्तींचे बोलणे मी आव्हान म्हणून स्वीकारले. गत तीन वर्षात या तीन एकर शेतीमध्ये तूर, सोयाबीन, कापूस अशा पिकांचे उत्पादन घेतले. यावर्षी पाऊन एकर शेतीमध्ये मी कांदा लावला. आम्हाला कांद्याचे एकूण शंभर क्विंटल उत्पन्न झाले आहे असे अक्षय म्हणाला.

शेतात पेरणीचा कांदा :मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असून कृषी अर्थशास्त्र हा विषय मला होता. यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन कसे करायला हवे याची माहिती मला आहे. मी माझ्या शेतात कांद्याची लागवड करण्याऐवजी कांद्याची पेरणी केली. लागवडीच्या कांद्यापेक्षा पेरणीचा कांदा हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न पेरणीच्या कांद्याद्वारे मिळते. मजुरीचा खर्च देखील कमी येत असल्यामुळे एकूण उत्पन्नात भर पडते. या कांद्याचा कालावधी आपल्या गरजेनुसार कमी जास्त देखील करता येतो. शेतीचा खर्च पाहता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पेरणी पद्धतीने कांदा घेणे फायदेशीर ठरणारे आहे. रासायनिक खतांचा वाढलेला भाव, मजुरीचा भाव पाहता लागवडीचा कांदा परवडणारा नाही. पेरणीच्या कांद्याला एकरी तीस हजार रुपये खर्च येतो. त्याद्वारे दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार पैसे मिळतात. माझ्या प्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी देखील पेरणीचा कांदा घ्यावा, असे देखील अक्षय चौरे म्हणाला.

हेही वाचा - Ajit Pawar On Rumour Of Rift : माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबत; अजित पवारांचे स्पष्टीकरण

Last Updated : Apr 18, 2023, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details