अमरावती -नव्याकृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे हरियाणा व पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने कोल्हापूर, अहमदनगर, नाशिकसह आदी जिल्ह्यातील शेतकरी निघाले आहे. रात्री अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे हे शेतकरी पोहोचले असता, त्यांनी मोझरी येथे सभा घेतल्या. तसेच सकाळी त्यांनी तुकडोजी महाराजांंच्या समाधीचे दर्शन दिल्लीकडे कुच केली आहे.
व्यापाऱ्याचे तोटे भरून काढण्यासाठी हे कायदे -
या आंदोलनात आतापर्यंत ४४ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. कुणीही मागणी न करता हे शेतकरी विरोधी कायदे कसे आले, असा प्रश्र या शेतकऱ्यांनी विचारला आहे. कोरोना काळात सर्व जग बंद होते. कार्पोरेट कंपनी, व्यापारी यांचे तोटे वाढत होते. त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई करण्यासाठी त्यांनी हे कायदे आणले आहे, असा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला.